मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची. आलिया आणि रणबीरनं त्यांच्या नात्याला नव्यानं ओळख देम्याचा निर्णय घेतला आणि ही गोष्ट चाहत्यांना कमाल आनंद देणारी ठरली. (Alia - Ranbir wedding )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नांतला राजकुमार सापडावा असंच आलियासोबत घडलं आहे. कारण ,ती ज्या अभिनेत्याची चाहती होती त्याच्याशीच लग्न करण्याची संधी तिला मिळाली. 


पण, आता लग्नाच्या या तयारीमध्येच एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळं चाहत्यांना धक्का बसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार आलिया- रणबीरचं लग्न रद्द झालं आहे. 


लग्न रद्द ? तुमच्याही पायाखालची जमिन सरकली ? तितका विचार करण्याची गरज नाही. कारण, लग्न रद्द झालं खरं,पण ते रद्द झालेलं लग्न होतं त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग. 


एखाद्या सुरेख अशा ठिकाणी लग्न करण्याचा बेत आलिया रणबीर 2020 च्या अखेरीस आखत होते. पनवेलच्या आलियाच्या बंगल्यावर यासाठीचे बेतही आखले गेले होते असं म्हटलं गेलं. 


पण, कोरोना महामारी आणि इतर काही कारणांस्तव या जोडीचं लग्न लांबलं. ज्यानंतर आता मुंबईतच आपल्या घरी ही जोडी अवघ्या 28 पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहे. 


13 एप्रिलपासून आलिया- रणबीरच्या लग्नसमारंभांची सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 13 तारखेला मेहंदी, 14 एप्रिलला हळद आणि संगीत आणि त्यानंतर पुढच्या दिवशी लग्नसोहळा अशी एकंदर या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याची रुपरेषा आहे.