मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा (Vijay Verma) आणि शेफाली शाह (Shefali Shah) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आलिया तिच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एप्रिलमध्ये लग्न बंधनात अडकले. गेल्या महिन्यात आलियानं तिच्या प्रेग्नेंन्सीची बातमी दिली. प्रेग्नेंसीमुळे आलियाला ट्रोलही करण्यात आलं. करिअर पीकवर असताना तिने आई होण्याचा निर्णय का घेतला, असे अनेकजण म्हणत आहेत. तिला ट्रोल करणाऱ्यांना आलियाने आता सडेतोड उत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्ससोबत आई होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने बोलली. 'काही स्त्रियांनी काहीही केलं तरी त्याची हेडलाईन होते. मग ती आई होणार असेल किंवा कुणाला डेट करते किंवा व्हॅकेशनवर गेली असेल तरी सुद्धा ती चर्चेचा विषय ठरते. सगळ्यांची नजर ही कायम स्त्रियांवर असते, असं आलिया म्हणाली. 



लहान वयात आई होण्याच्या निर्णयावर आलियाला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आलिया म्हणाली, 'मला माझी पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ बॅलेंस कशी करायची ते माहित आहे.  ते जाऊ द्या, कधीकधी आपण काहीही प्लान करत नाही परंतु सर्वकाही आपोआप घडते. लोकांचा दृष्टीकोन बदलतो आहे, याचा तिला आनंद आहे. तिने अशा अनेक बातम्या वाचल्या ज्यामध्ये अनेक लोकं तिला पाठिंबा देत आहेत. आता काळ बदलला आहे आणि आपण नको त्या लोकांकडे लक्ष देऊ नये', असे देखील तिनं पुढे सांगितले.


आलियाच्या करिअर बद्दल बोलायचे झाले तर 'डार्लिंग्स' हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यानंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.