मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनत्री आलिया भट्ट गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा पार्ट्यांमध्ये दोघे कायम एकमेकांसोबत असतात. त्यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असल्यामुळे त्यांना लग्न कधी करणार असा प्रश्न कायम विचारला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण चाहत्यांच्या या प्रश्नावर आलिया आणि रणबीरने अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. आलिया आणि रणबीरचं नातं संपूर्ण कपूर कुटुंबाला मान्य आहे. दोघे कायम अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. 


शिवाय सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करतात. आता देखील आलिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती स्वतःचे  काही फोटो शेअर केले आहेत. 



फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'कॅजुअली फ्लेक्सिंग माय बॉयफ्रेंड फोटोग्राफी स्किल...' यावरून रणबीरची फोटोग्राफी स्किल सर्वांसमोर आली. रणबीरची फोटोग्राफी कााही चाहत्यांना आवडली तर काही चाहत्यांनी त्याची मजेशीर अंदाजात खिल्ली उडवली. 


रणबीर आणि आलियाच्या कामाबद्दल सांगितलं तर, दोघे लवकरचं 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघे पहिल्यांदाचं एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. एवढंच नाही तर आलियाच्या, 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष आहे.