Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याचं कारण कधी तिचं चित्रपट असतात तर कधी तिचं खासगी आयुष्य. आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण तिचं खासगी आयुष्य असून तिच्या आई-वडिलांविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. इतकंच नाही तर तिनं हे देखील सांगितलं आहे की त्यांचा एक काळ असा होता जेव्हा सगळं काही विस्कळीत झालं होतं. आलियानं यावेळी तिची आई सोनी राजदान आणि वडील महेश भट्ट यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 


सोनी राजदान यांना साकारायची होती मुख्य भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं की 'आई सोनी राजदान जेव्हा चित्रपटात काम करत होती तेव्हा तिला कोणी ओळखत देखील नव्हतं. तिला व्यवस्थित हिंदी देखील बोलता येत नव्हती. त्यामुळे तिला काम मिळणं खूप कठीण होतं. माझ्या आईला आधीपासूनचं लीड रोल असेलेल्या भूमिका साकारायच्या होत्या. लोकांनी तिला सल्ला दिला की तू खूप मेहनत कर एक दिवस तुला नक्कीच लीड रोल मिळेल. पण हे सत्य नव्हतं.' 



आलिया पुढे म्हणाली की 'तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या करिअरमध्ये जितकं स्ट्रगल पाहिलं आहे तितकी ती कधीच पाहू शकत नाही. तिला सगळ्या गोष्टी काहीही न करता मिळाल्या आहेत. त्यामुळे तिला या सगळ्यांचं किती महत्त्व आहे याची जाणीव आहे. कारण उद्या जर हेच सगळं माझ्यासोबत झालं आणि माझे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि मला काम मिळणं बंद झालं तर मी या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन, तर मी यातून बाहेर पडण्यासाठी किंवा लढा देण्यासाठी मी तयार राहिन. त्यासोबतच नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवेन की मला चांगल्या संधी मिळाल्या आहेत आणि मी कधीच कोणाला तक्रार करण्याची संधी देणार नाही.'


सोनी राजदाननं बुनियाद सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय लेक आलियासोबत राजी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात आलिया भट्टनं मुख्य भूमिका साकारली होती.



वडील महेश भट्ट व्यसनाधीन


महेश भट्ट यांच्या विषयी बोलायचे झाले तर 80 च्या दशकात त्यांनी अर्थ आणि सारांश हे चित्रपट बनवलं होते. महेश भट्ट यांना त्यांच्या चित्रपटासाठी ओळखलं जातं. पण ते नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्याविषयी बोलताना आलिया म्हणाली की तिचे वडील त्यांचं करिअर ढासळत असल्याचं पाहून चिंतेत होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ते व्यसनाधीन झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.