मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री रेखा या आजही आपल्या अदा आणि स्टाइलने चाहत्यांच मन जिंकतात. नुकत्याच IIFA Award सोहळ्यात रेखा आणि आलिया भट्ट भेटल्या आणि तेव्हाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. त्यावरून रेखा यांची क्रेझ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत रेखा यांनी आलियाच्या 'गली बॉय' या सिनेमातील डायलॉग म्हटलं आहे. झालं असं की, या कार्यक्रमात आलियाने रेखा यांना 'गली बॉय' सिनेमातील फेमस आणि लोकप्रिय डायलॉग शिकवला आहे. रेखा या डायलॉगला असं बोलतात की, सगळेच हैराण होऊन जातात. आणि तेथे उपस्थित असणारे सर्व कलाकार जोरदार टाळ्या वाजवतात. 



आयफा अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या "गली बॉय' या सिनेमाचं ऑस्करला नामांकन झालं आहे. यामुळे हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच याअगोदर सोहळ्यातील रेखा यांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. आणि आता हा व्हिडिओ.


कामाबद्दल बोलायचं झालं तर आलिया भट्ट सध्या वडिल आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'सडक 2'या आगामी सिनेमांत दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी जुलै महिन्यात रिलीज होणार आहे. यानंतर आलिया आणि रणबीर कपूर 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे. अयान मुखर्जी हा सिनेमा दिग्दर्शित करत असून पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करत आहे.