मुंबई : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे. आलिया - रणबीरसोबत अनेक आऊटिंग करताना दिसत आहे. आलिया आपल्या या नात्याबद्दल अधिक सिरियस असून तिने लाँग लाईफ करताना अनेक प्लान्स केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच आलियाचं असं म्हणणं आहे की, तिला रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफप्रमाणे रिलेशनशिपमध्ये चूक करायची नाही. त्यामुळे आलिया आता खूप अलर्ट आहे. 


डेक्कन क्रॉनिकलमध्ये छापून आलेल्या माहितीनुसार, आलियाने सर्वाधिक वेळ रणबीरसोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ती काहीही करायला तयार आहे. 


असाच काहीसा हाल कतरिनाचा देखील झाला होता जेव्हा ती रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. कतरिनाने आपल्या करिअरमुळे रिलेशनशिपला खूप लांब ठेवलं होतं. 


पण ही चूक आलियाला करायची नाही. कारण आजही कतरिनाला आपल्या या निर्णयामुळे पश्चाताप होत आहे. आजही कतरिना एकटी आहे. 


काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि आलियाचे वडिल महेश भट्ट यांनी द टेलीग्राफ यांना एक महत्वाची गोष्ट शेअर केली होती. ते म्हणाले की, हो या दोघांमध्ये प्रेम आहे. पण त्यामध्ये कन्फर्म करण्यासारखं काहीच नाही. 


 



तर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कतरिनाने सांगितलं की, ब्रेकअपनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. आता ती अधिकवेळ स्वतःला देते आणि स्वतःचा विचार करते. आयुष्य अधिक चांगल करायला मला पु्न्हा एकदा वेळ मिळाला आहे. तिचं ब्रेकअप होणं हे कोणत्याच वरदानापेक्षा कमी नाही. 


कतरिना कैफ आणि रणबीर कपूरचं नातं हे सहा वर्ष सुरू होतं. पण अचानक या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कतरिना गेल्या दोन वर्षांपासून एकटीच असून रणबीर कपूर आता आलियाला डेट करत आहे.