मुंबई : आलिया भट्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) विमानतळावर तिच्या सामानाच्या ट्रॉलीसह धावताना दिसली. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित लोकांनी टिपला ज्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री तिच्या आगामी 'रॉकी और रानीकी प्रेमकहानी' प्रेमकथेच्या शूटिंगसाठी दिल्लीत होती.  तेव्हा ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ती खूपच नाराज दिसत आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक करण जोहरही एका शॉटमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आलियाच्या अशा प्रकारे पळत जाताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि तिला पाहतच राहिले. आलिया भट्ट आणि करण जोहर यांना IGI विमानतळावर पाहण्याची लोकांना अपेक्षा नव्हती. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगसाठी आलियासोबत चित्रपटाचे क्रू देखील धावताना दिसले.


अनेक वर्षांनी करण जोहर या चित्रपटातून दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. गेल्या महिन्यात त्याने या चित्रपटाच्या शूटिंगची एक झलक शेअर केली होती. याआधी त्याने रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबतचा एक फोटो शेअर करून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर केली होती.



फोटो शेअर करत करण जोहरने चित्रपटातील कलाकार आणि टीम स्टाफबद्दल एक कविता लिहिली आहे. त्याने प्रीतमच्या संगीताबद्दल लिहिलं की, हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि व्हायकॉम 18 स्टुडिओ करत आहेत. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी यापूर्वी झोया अख्तरच्या गली बॉयमध्ये काम केलं होतं आणि तिचा हा दुसरा चित्रपट आहे.