मुंबई : 'बिग बॉस ओटीटी 2'ची स्पर्धक आलिया सिद्दीकीने कदाचित नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतची सगळी भांडणं मिटवली आहे. कारण ज्या अभिनेत्यावर आरोप लावले गेले होते. ज्याचे व्हिडीओ बनवून त्याची इज्जत काढली गेली. इतकंच नाही तर पोलिस केस आणि कोर्ट केसदेखील अभिनेत्यावर करण्यात आली होती. २०२३ साली हे दोघं अधिकृतपणे वेगळेही झाले होते. मात्र नुकतीच आलियाने एक अशी पोस्ट शेअर केली आहे जे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसत आहे. शेअर केलेल्या फोटोत आलिया  नवाजसोबत तिच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ मार्च २०२४ ला आलियाने आपल्या इन्स्टाग्राम हँण्डलवर घटस्फोटानंतर पहिल्यांदा कुटूंबासोबत फोटो पोस्ट केला आहे. फोटोत आलिया आणि नवाजुद्दीन आपल्या मुलगी शोरा आणि मुलगा यानीसोबत देताना दिसत आहे. हा फोटो न्यू ईयर दरम्यान घेण्यात आला होता.  आलियाने हा फोटो शेअर करत लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा करत एक नोटदेखील लिहीली आहे. 'मी माझ्या एकमेव जोडीदारासोबत विवाहित जीवनाची १४ वर्षे साजरी करत आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'


आलिया सिद्दीकी करत होती दुसऱ्याला डेट  
'बिग बॉस ओटीटी 2'मधून बाहेर पडल्यानंतर आलियाने आपलं जीवन पुन्हा एकदा नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. 5 जून 2023ला तिने आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबत एक फोटो पोस्ट केला होता. फोटोत आलिया तिच्या कथिक बॉयफ्रेंडसोबत कॉफी पिताना दिसली होती. याचबरोबर आलियाने कॅप्शनमध्ये लिहीलं होतं की, ज्या नात्याला मी सगळ्यात जास्त महत्व देते. रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी तिला 19 वर्षे लागली. याचबरोबर तिने असंही सांगितलं की, तिच्यासाठी तिची मुलं सर्वोच्च प्राथमिकता आहेत. याचबरोबर तिने तिच्या नव्या नात्याविषयी खुलासा केला, जे रिलेशनशिपवर आहे. मात्र, आता तिने तिच्या इन्स्टा हँडलवरून ही पोस्ट डिलीट केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलियाची पोस्ट पाहून चाहते हैराण
आलिया सिद्दीकीची एनिवर्सरी पोस्ट पाहून आता युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, यांचा तर घटस्फोट होत होता ना? तर अजून एकाने लिहीलंय, 'तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे तर तू नेहमी त्याला का त्रास देतेस?' तर अजून एकाने लिहीलंय, वाटतंय या दोघांमध्ये सगळं नीट झालंय. मला हे पाहून आनंद होतोय.'' अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स नेटकरी आलियाच्या पोस्टवर करत आहेत.