मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून 'सडक २' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'सडक २' चित्रपटाचं दिग्दर्शन आलियाचे वडिल महेश भट्ट करत आहेत. या चित्रपटात आलियासह तिची मोठी बहिण पूजा भट्टही स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरु झालं असून आता चित्रपटाचं दुसरं शेड्यूल उटीमध्ये शूट करण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया गाणंही गाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील एक रोमॅंटिक गाणं आलिया गाणार आहे. पुढील महिन्यात उटीमध्ये चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर या गाण्याचा फायनल ट्रॅक रेकॉर्ड करण्यात येणार आहे. आलिया आणि पूजा यांच्यासह चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूरही प्रमुख भूमिका साकारणार आहे.




'सडक' ९०च्या दशकातील सुपरहिट रोमॅंटिक थ्रीरल चित्रपट आहे. पूजा भट्ट आणि संजय दत्त यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. तर आगामी 'सडक २' याच चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. दिग्दर्शक महेश भट्ट 'सडक २' मधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आलिया आणि महेश भट्ट 'सडक २' चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.