मुंबई :  'गंगुबाई काठियावाडी' सिनेमामुळे अभिनेत्री आलिया भट्ट तुफान चर्चेत आहे. तर आतापर्यंत  बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थपित करणाऱ्या आलियाने आता तिचा मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला आहे. आलीया 'आरआरआर' सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. आलियाचा हा नवा प्रवास साउथचा प्रसिद्ध अभिनेता राम चरण (Ram Charan) सोबत सुरू होणार आहे. त्यामुळे बॉलिवडप्रमाणे आलियाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत यश मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम चरणच्या वाढदिवसाचं  औचित्य साधत सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या या पोस्टरची चर्चा सर्वत्र जोरदार रंगत आहे. सिनेमात  राम आणि आलिया मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सिनेमात आलिया, राम चरणच्या पत्नीची भुमिका साकारणार आहे. चाहत्यांच्या मनात सिनेमाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 



तर  दुसरीकडे धणुष्य बाण हातात घेवून राम निशाणा साधताना दिसत आहे. त्याच्या हा दमदार लूक  चाहत्यंच्या पसंतीस पडत असून चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. सिनेमात राम चरण स्वतंत्रता सेनानी अल्लूरी सीताराम राजू ही भुमिका बजावणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शन  एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी केलं आहे.  



दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी 'आरआरआर' सिनेमा रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. तर याच दिवशी अभिनेता अजय देवगन स्टारर 'मैदान' सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्य़ामुळे मैदानात कोणता  सिनेमा बाजी मारतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.