मुंबई: बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटींना मराठी भाषेचं आकर्षण आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर पासून विकी कौशलपर्यंत सगळेच कलाकार  कमी अधिक प्रमाणात मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता आलिया भट्टच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.लंडनमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी जात असताना आलिया विमान तळावर स्पॉट झाली. त्यावेळी तिने चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चॅरीटी गाला या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी ही आलियावर होती. हर्षदीप कौर, विनोदवीर रोहन जोशी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर उषा जे हे देखील आलिया सोबत कार्याक्रमाचे मुख्य भाग होते.विमानतळावर आलियाला कोणीतरी नमस्कार वहिनी असं म्हटलं. त्यावेळी मराठीतून आलेला आवाज कळताच तिने कॅमेऱ्यासमोर गोड स्माईल दिली, तिच्या या स्माईलवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला. आलियाचा हा व्हिडीओ हा सोशलमिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.विरेंद्र चावला या इंस्टा युजरने हा व्हिडीओ शेयर केला आहे.  तिची गोड स्माईल आणि साध्या सिंपल लूकवर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. तिची स्माईल जितकी गोड आहे तितकाच तिचा लुक साधा आहे, असं एका युजरने कमेंट केली. 


आलिया कधी तिच्या नव्या सिनेमानिमित्ताने तर कधी ती तिच्या आणि रणबीर सोबतच्या नात्याबद्दल कायमच चर्चेत आली आहे. गेल्या महिन्यात करीना कपूरच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला  रणबीर आणि आलियाची लेकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आलियाची लेक आणि रणबीर या बापलेकीकडे पार्टीतील सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. या बापलेकीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत आलिया सोबत हवी होती अशा कमेंट देखील केल्या होत्या. आलियाचा आगामी सिनेमाचं शुटींग नुकतंच पूर्ण झालं आहे.  वेदांग रैनासोबत ती मुख्य भुमिकेत झळकणार असून तिचा 'जिगरा'हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


कधी बारबी गर्ल तर कधी बोल्ड अंदाजाने आलिया कायम तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरते. बिनधास्त शैली आणि तितकाच साधा मेकअप अशी आलिया कायमच नेटकऱ्य़ांचं मन जिंकते. या वेळेस ही तिच्या हटके अंदाजाने लोकांची मनं जिंकली आहेत. करण जोहर दिग्दर्शित रॉकी ऑर रानी या सिनेमात रणवीर सिंगसोबत झळकली . रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तिच्या आगामी सिनेमातील भुमिकेला आणि वेदांगसोबतची केमिस्ट्रीला प्रेक्षक पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.