मुंबई : दिग्गज गायिका अल्का याग्निक यांनी हिंदी सिनेमा एक काळ गाजवला आहे. आजही अल्का याग्निक यांचा आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. आजही लोकांना अल्का याग्निक यांचा आवाज ऐकायला आवडतं. 'प्यार की झंकार' आणि 'मेरे अंगने में'  सारख्या गाण्यातून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. अल्का याग्निक यांनी हिंदी सिनेमाला सुपरहिट गाणी दिली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्का याग्निकने वयाच्या १४ व्या वर्षी संगीत क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. महत्वाचं म्हणजे 16 भाषांमध्ये 2 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. 


अल्का याग्निक या प्रोफेशनल आयुष्यात खूप लोकप्रिय आहेत. मात्र यामागे त्यांची खूप कठोर मेहनत देखील आहे. 



अल्का यांनी १९८९ साली शिलाँगचे व्यावसायिक नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केलं. मात्र दोघं २७ वर्षांहून अधिक काळ एकमेकांपासून लांब राहिले आहेत.


पतीपासून या कारणामुळे लांब राहिल्या अल्का याग्निक 


नीरज यांचा व्यवसाय शिलाँगमध्ये होता. तर अल्का याग्निक यांच्या स्वप्नांच शहर मुंबई आहे. यामुळे या दोघांना एकमेकांपासून लांब राहणं हे परिस्थितीने निर्माण केलं. 


एकमेकांनी आपलं करिअर करण्यासाठी लांब राहणं स्वीकारलं. पण असं असलं तरीही त्यांचे हे नातं हळूवारपणे सुरू राहिलं. 


नीरज अनेकदा अल्का यांना भेटायला मुंबईत येत असतं. अल्का यांनी आपलं करिअर सांभाळत मुलांच संगोपन केलं. त्या सिंगल मदर होऊन मुलांना सांभाळत असतं. 


अल्का याग्निक यांनी आनंदाने स्वीकारला दुरावा 


अल्का यांनी मुलाखतीत सांगितलं की,'नीरज यांनी मुंबईत व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र तो एका लहान शहरातून आले होते.


त्यामुळे मुंबईशी जोडणं त्यांना थोडं कठीण होत होतं. त्यामुळे मीन त्यांना शिलाँगमध्ये राहण्यास सांगितलं. यानंतर नीरज हे शिलाँगमध्ये राहिले आणि आपला व्यवसाय वाढवला.