मुंबई : ईशा अंबानीच्या लग्नादिवशी कपिल शर्मा आणि रोडीजचा को फाऊंडर रघु रामने देखील लग्न केलं. यासोबत आणखी तीन कलाकार लग्नबंधनात अडकले. 2018 च्या या सरत्या दिवसांमध्ये आणखी एक स्टार किड विवाह बंधनात अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका अलका याग्निक यांची मुलगी सायशाचं देखील लग्न झालं आहे. 12 डिसेंबरला अलका यांची मुलगी सायशाने बॉयफ्रेंड अमित देसाईसोबत लग्न केलं आहे. 


लग्नाच्या दिवशी सायशाने डार्क लाल रंगाचा लेहंगा घातला होत आणि अमितने सफेद रंगाची शेरवानी घातली होती. सायशाने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये मेहंदी, हळदी आणि संगीतचा प्रोग्राम 10 आणि 11 डिसेंबर रोजी झाला. 



सायशाने गेल्यावर्षी 25 डिसेंबर रोजी अमितसोबत साखरपुडा केला. दोघं एकमेकांना खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अखेर 12 डिसेंबर रोजी दोघांनी सात फेरे घेतले. 



सायशाने लंडनमध्ये स्कूल ऑफ मार्केटिंगमधून एमबीए केलं आहे. आई बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका असूनही सायशाने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला नाही. तिला बिझनेसमध्ये अधिक रूची आहे. पण सायशाने गायिका अलका यांच्याकडून गाण्याचं शिक्षण घेतलं आहे.  



अलका याग्निक आणि शिलाँग बेस्ड बिझनेसमन नीरज कपूर यांनी 1989 मध्ये लग्न केलं. मात्र गेल्या 26 वर्षांपासून अलका नवऱ्यापासून वेगळ्या राहत आहेत. सिंगल मदर राहून त्यांनी मुलीचं पालनपोषण केलं आहे. अलका आणि नीरज यांनी घटस्फोट घेतला नाही पण ते आपल्या व्यस्त शेड्युलमध्ये वेगळे राहतात. 


28 वर्षांची सायशा अंधेरीतील Boveda Bristro ची मालकीन आहे. ती हे रेस्टॉरंट आपल्या दोन बालपणीच्या मित्रांसोबत चालवत आहे. सायशाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी अलका यांच्या भावाने घेतली.