सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मराठी चित्रपटसृष्टी सरसावली
सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी आनेक हात पुढे येत आहेत.
मुंबई : सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी आनेक हात पुढे येत आहेत. प्रत्येक जण माणुसकीच्या नात्याने मदत करताना दिसत आहेत. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारांनी देखील पुढाकार घेतला आहे. पुरग्रस्तांना सध्या जीवनाश्यक वस्तूंची गरज आहे. त्यामूळे मराठी कलाकारांनी इतरांना देखील शक्य त्या मार्गाने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मराठी अभिनेता सुबोध भावेसह नाट्य, रंगमंच, संगीत क्षेत्रातील मंडळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
येथील नागरिकांना सध्या गृहपयोगी वस्तूंची नितांत गरज आहे. साचलेल्या पाण्यामूळे दुर्गंदीचे प्रमाण फार वाढले आहे, त्यामूळे धूप यांसरख्या वस्तूंची गरज आहे. त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन, औषधे अशा जीवनाश्यक वस्तूंची फार गरज असल्याचे अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगीतले आहे.
अशा कठीण प्रसंगी पुरग्रस्तांना मानसिक आणि आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे. अशा परिस्थितीत देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात धावून येत आहेत. सामान्य जनतेकडून शक्य त्या मार्गाने पुरग्रस्तांची मदत करत आहे. तर दूसरीकडे नेहमी सामान्य जनतेचे आभार माननाऱ्या बॉलिवूडकरांनी त्यांच्या चाहत्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.