मुंबई : गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांना पोटधरुन हसवण्याचं काम  ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम करतो आहे. नुकत्याच या मालिकेने 400 एपिसोड पूर्ण केले आहेत. या एपिसोडमध्ये या मालिकेतील कलाकार जेव्हा वेगवेगळ्या राजकारण्यांच्या भूमिकेत येतात तेव्हा काय होतं.?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ



‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे. सर्व प्रेक्षकांना हास्याचा व मनोरंजनाचा डबल डोस देणाऱ्या कार्यक्रमाचे ४०० भाग पूर्ण होणार म्हणजे मोठं सेलिब्रेशन तर होणारच आणि म्हणूनच प्रेक्षक २० ते २४ ऑगस्ट पर्यंत 'चला हवा येऊ द्या' हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. 


४०० भागांच्या या धमाल मस्तीमध्ये रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले. चित्रपटसृष्टीतील ३ नावाजलेले जाधव म्हणजेच दिग्दर्शक संजय जाधव, रवी जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव हे त्यांच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने सर्वांना थिरकायला लावणार आहेत.