Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्‍पा 2' ची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासमोर त्यावेळी दुसरा कोणताही चित्रपट नाही. कारण 'सिंघम अगेन' च्या निर्मात्यांनी आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली आहे. अशात अल्लू अर्जुनचा हा चित्रपट नवा रेकॉर्ड करु शकतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे की चित्रपट प्रदर्शनाआधीच त्यानं नवा रेकॉर्ड केला आहे. 500 कोटींचा बजेट असणाऱ्या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोणालाही याविषयी काही माहिती देण्याची गरज नाही की 2021 मध्ये जेव्हा चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्यानं सगळ्यांची मने जिंकली होती. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले होते. या सगळ्यात आता 'ट्रॅक टॉलिवूड' च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं आता KGF 2 आणि RRR या चित्रपटाचे प्रदर्शित होण्या आधीचे रेकॉर्ड मोडले आहेत. 



रिपोर्ट्नुसार, असं म्हटलं जातं की 'पुष्‍पा 2' च्या हिंदी डब व्हर्जनसाठी कथितपणे 200 कोटींची डील केली होती. या विषयी नवभारत टाईम्सनं रवीना टंडनचा मुलगा अनिल थडानीनं उत्तर भारतात चित्रपटाच्या डिस्ट्रीब्यूशनसाठी डील केली आहे. तर रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की दक्षिण भारतात डिस्ट्रीब्यूशनसाठी 270 कोटी रुपयांचे थिएटर राइट्स विकले आहेत. तर परदेशात 100 कोटी पेक्षा जास्तची डील झाली आहे. याचा अर्थ चित्रपटानं प्रदर्शित होण्याच्या आधीच 570 कोटींची कमाई केली आहे. 


हेही वाचा : '8-9 वर्षांपूर्वी मी...', प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर राजकुमार रावची प्रतिक्रिया


याशिवाय OTT वर प्रदर्शनासाठी कथितपणे नेटफ्लिक्सनं या 'पुष्पा 2' च्या स्ट्रीमिंगचे राइट्स 275 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. हा आतापर्यंतच्या कोणत्याही दाक्षिणात्य चित्रपटाच्या इतिहासातील सगळ्यात जास्त मानधन आहे. त्यासोबतच गेल्यावेळी चित्रपटाची गाणी पाहता यावेळी ऑडियो राइट्सदेखील मोठ्या रक्कमेत विकले गेल्याचे म्हटले जाते. तर टिव्हीवर चित्रपट प्रदर्शनासाठी  सॅटेलाइट राइट्समधून कोटींची डील झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑडियो आणि सॅटेलाइट्स राइट्सची एकूण डील ही निर्मात्यांना 450 कोटींची झाली आहे. याप्रमामे प्री-रिलीजच्या आधी आलेल्या या आकड्यांवरून एक माहिती समोर आली आहे की 1295 कोटींची कमाई त्यानं आधीच केली. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा एक नवा रेकॉर्ड आहे.