'पुष्पा' चित्रपटामुळे अल्लू अर्जून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जूनला करिअरच्या सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागला होता. अल्लू अर्जुन हा अल्लू रामलिंगय्या यांचा नातू आणि चिरंजीवी यांचा भाचा आहे. मात्र असं असलं तरी त्याला चित्रपटसृष्टीत पाय रोवताना आव्हानांचा सामना करावा लागला होता. अल्लू अर्जूनने 2003 मध्ये 'गंगोत्री' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. के राघवेंद्र राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. पण चांगलं दिसत नसल्याचं सांगत अल्लू अर्जूनला चांगले चित्रपट मिळत नव्हते. 'गंगोत्री हिट झाला होता. पण मी छाप सोडण्यात अपयशी ठरलो होतो,' असं अल्लू अर्जूनने सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आर्या' चित्रपटाला 20 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हैदराबादमध्ये सेलिब्रिशन करण्यात आलं. यानित्ताने आयोजित कार्यक्रमात अल्लू अर्जूनने जोपर्यंत आपण आर्या चित्रपटात झळकलो नाही तोपर्यंत अपेक्षित यश मिळालं नाही असा खुलासा त्याने केला. 


अल्लू अर्जूनने यावेळी सांगितलं की, "गंगोत्री हिट झाला होता. पण मी चांगला दिसलो नाही. त्यामुळे माझ्या वाट्याला चांगले चित्रपट आले नाहीत. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पण मी छाप न सोडू शकल्याने कलाकार म्हणून अपयशी ठरलो. मी 0 पासून - 100 पर्यंत गेलो. मी त्यावेळी काहीच नव्हतो". अल्लू अर्जूनने यावेळी त्याच्या पदार्पणानंतरही तो हैदराबादमधील आरटीसी क्रॉसरोडवर फिरत होता, नवीन रिलीज पाहत होता आणि स्क्रिप्ट ऐकत होता ज्या त्याला आकर्षित करण्यात अयशस्वी झाल्या असं सांगितलं. 


पण दिल चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावल्यानंतर हे सर्व बदललं. "तिथे मला सुकूमारने आर्या चित्रपटासाठी विचारणा केली. त्याला पहिलाच चित्रपट होता. पण त्याने जे लिहिलं होतं ते मला आवडलं होतं. चिरंजीवी यांनीही कथा ऐकली. चित्रपटाने सर्व गोष्टींवर मात करत चित्रपटगृहांमध्ये 125 दिवस पूर्ण केले. जेव्हा मी रवी तेजाचा इडियट पाहिला तेव्हा, अशा कूल चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. आर्या मूर्ख होता. मला माहिती होतं की, मी चांगला डान्स करु शकतो आणि मला ते सिद्ध करायचं होतं. आर्यामध्ये मला ती संधी मिळाली," असं अल्लू अर्जून म्हणाला. 


"आर्यापासून ते पुष्पापर्यंत जर एखाद्या व्यक्तीने माझं आयुष्य बदललं असेल आणि जास्तीत जास्त प्रभाव असेल तर तो सुकूमार आहे. चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप त्याने मला एक अभिनेता म्हणून रुळावर राहण्यास मदत केली," अशी भावना अल्लू अर्जूनने व्यक्त केली. 


आर्या रिलीज झाला तेव्हा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने अभिनेता आणि दिग्दर्शक दोघांच्याही कारकिर्दीचा मार्ग बदलला. संगीतकार देवी श्री प्रसाद हे चित्रपटाच्या टीममधील एकमेव होते ज्यांच्याकडे काही अनुभव होता. खडगम, मनमधुडू आणि वर्षासारख्या चित्रपटांसाठी आधीच प्रसिद्ध होते.


सुकूमार आता अल्लू अर्जूनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'पुष्पा' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात रश्मिका आणि फदाह हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत.