ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये तेजस बर्वेची एन्ट्री
या मालिकेत एक नवीन एन्ट्री झाली
मुंबई : पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.
आता या मालिकेत एक नवीन एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे अभिनेता तेजस बर्वेची. अप्पांनी सईसाठी अजिंक्य आफळे या उपवर मुलाची निवड केली आहे आणि त्या मुलाची व्यक्तिरेखा अभिनेता तेजस बर्वे साकारतो आहे. सईचं प्रेम नचिकेतवर आहे हे कळताच अप्पा लगेचच सईसाठी योग्य मुलगा शोधण्याची लगबग करतात आणि म्हणूनच सईला अजिंक्य पाहायला येणार आहे. आता अजिंक्य येण्याने मालिकेत अजून काय गम्मत येईल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
मालिकेत नवी एन्ट्री...