Aman Gupta Shark Tank : शार्क टॅंक इंडियाचा परिक्षक आणि बोट या कंपनीचा फाउंडर अमन गुप्ताचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमन गुप्तानं चित्रपटसृष्टीतील एका अ‍ॅटिट्यूड असलेल्या सांगितलं. अमन आणि शोचा दुसरा जज अनुपम मित्तल या दोघांनी एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी हा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमन आणि अनुपम या दोघांनी दोस्तकास्ट नावाच्या एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्यानं सांगितलं की बोटसाठी चित्रपटसृष्टीतील इंडस्ट्रीच्या मोठ्या कलाकारांना ब्रॅन्ड एम्बॅसिडर बनवलं होतं. अमनच्या म्हणण्यानुसार, या अभिनेत्याविषयी काही चांगल्या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. पण जेव्हा त्यानं प्रत्यक्ष त्या कलाकारासोबत काम केलं तेव्हा त्याला कळलं की ते सगळं खोटं होतं. तो कलाकार खूप गर्विष्ट आहे हे त्याला कळलं.


अमन याविषयी सांगताना म्हणाला, 'आमच्यासोबत हा अभिनेता ब्रॅंड एम्बॅसिडरच्या रुपात होता. तो खूपच गर्विष्ठ होता. तर बातम्यांमध्ये मी नेहमीच त्याच्याविषयी चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. लोकांनी त्याला नेहमीच चांगला स्वभाव आहे, दयाळू, नम्र असल्याचं सांगितलं. पापाराझी आणि चाहत्यांसोबत त्याचे चांगले संबंध आहेत असे म्हटले जायचे. इतकंच नाही तर हे पण लिहिलं होतं की तो इकॉनमी क्लासमधून प्रवास करतो. पण जेव्हा त्यानं आमच्यासोबत काम केलं तेव्हा त्याचं सत्य आमच्यासमोर आले. त्या अनुभवानं मला शिकवलं की आजकाल लोकांनी नम्र असण्याचा अभिनय कसं करतात ते शिकून घेतलं आहे.' त्याशिवाय अमन पुढे म्हणाला की आपल्या देशातील लोक हे हुशार आहेत. त्यांना काय खोटं आणि काय खोटं ते कळतं. 


हेही वाचा : खरंच सलमानसोबतच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या का? उत्तर देत संगीता बिजलानी म्हणाली...


अमन गुप्ताच्या या पॉडकास्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर यावेळी रेडिटवर नेटकऱ्यांनी बोटसोबत सगळ्यात आधी काम केलेला गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आणि कार्तिक आर्यन या दोघांची नावं घेतली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'हा कार्तिका आणि दिलजीत या दोघांपैकी एक असेल.' दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की 'दोघांविषयी इकॉनमी क्लासमधून प्रवास करण्याविषयी बातमी समोर आली होती.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कार्तिक आर्यन आणि दिलजीतचं नाव न घेता त्यानं त्या दोघांकडे इशारा केला आहे?'