अंबानी कुटुंबाला रणवीर सिंगमुळे मोठा झटका, का होतेय एकच चर्चा?
रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला कल्पना आहे.
मुंबई : अंबानी कुटुंबाचं बॉलिवूड कलाकारांसोबत खास कनेक्शन आहे. बऱ्याचदा मोठ मोठे सेलिब्रिटी अंबानी कुटुंबाच्या पार्ट्यांना न चुकता हजेरी लावताना दिसतात.बॉलिवूडमधील टॉप कलाकारांचे सिनेमे सुद्धा मुकेश अंबानी प्रोड्युस करताना दिसतात. रिलायन्स एंटरटेनमेंट अंतर्गत आतापर्यंत अनेक सिनेमे रिलीज झाले आहेत.
रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला कल्पना आहे.अंबानी कुटुंबाची जगभरात एक खास ओळख आहे. मुकेश अंबानी हे बिझनेस जगतातील एक मोठे नाव आहे, त्यांची अनेकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, परंतु त्यांचे कुटुंब देखील अनेकदा सगळ्यांचं लक्षवेधून घेते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना विशेषत: चर्चेत असतात.
पण आता एका अभिनेत्यामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आलं आहे. या सेलिब्रिटीमुळे अंबानी कुटुंबाला कोटींच नुकसान झालं आहे. एका रिपोर्टनुसार, सध्या सर्वत्र रणवीरची खिल्ली उडवली जात आहे.
अंबानी यांनी रणवीर सिंगच्या चित्रपटावर खर्च केलेला पैसा त्यांना परत मिळण्याची आशा संपली आहे. रणवीर सिंगचा सिनेमा 83 आता बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे पडला आहे.
अनिल अंबानींच्या रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटासाठी 125 कोटी रुपये गुंतवले होते असं बोललं जात आहे. हा बिग बजेट सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 4-5 दिवसांत पूर्ण पैसे कमावेल आणि नंतर चांगला नफा मिळेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण तसं झाले नाही.
पण याउलट घडले. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केवळ निर्मात्यांनाच नाही तर सर्वसामान्य प्रेक्षकांनाही तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे वाटले होते.
मात्र या चित्रपटावर जी रक्कम खर्च झाली आहे ती मिळणे शक्य नव्हते. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने केवळ 59 कोटींची कमाई केली आहे.
रणवीर सिंगने अंबानी कुटुंबाला दिलेला हा करोडोंचा धक्का असल्याचं बोललं जात आहे. वास्तविक हा चित्रपट 2021 मधील सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट असेल अशी अपेक्षा होती. निर्मात्यांनाही आशा होत्या की हा चित्रपट चांगली कमाई करेल.
पण इतकी मागणी असूनही, सर्व आशा धुळीला मिळाल्या आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली नाही. 83 चित्रपट फ्लॉप झाल्याने चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंगला सर्वाधिक फटका बसला आहे.
रिपोर्ट्सनुसार, आता रणवीर सिंगच्या फिसमध्ये ही कपात होणार आहे. असं बोललं जात होतं, की चित्रपटाच्या 200 कोटींच्या फिस व्यतिरिक्त रणवीर सिंगला रिलीजनंतरच्या नफ्यातील वाटाही हवा होता. पण तसं घडू शकलेलं नाही.