मुंबई: बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या घरी नातू पृथ्वी अंबानीचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. 10 डिसेंबर 2020 रोजी आकाश आणि श्लोका अंबानी यांचा मुलगा म्हणून जन्मलेला पृथ्वी हा अंबानी कुटुंबाचा सर्वात छोटा राजकुमार आहे. नुकताच 10 डिसेंबर 2021 रोजी पृथ्वी एक वर्षाचा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबानी कुटुंबाने गुजरातमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरी त्याचा वाढदिवस अगदी शाही पद्धतीने साजरा केला. हा विशेष सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला, ज्याची झलक आता समोर आली आहे.



10 डिसेंबर 2021 रोजी, पृथ्वी अंबानी याचा पहिला वाढदिवस अंबानी कुटुंबाने त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी जामनगर येथे साजरा केला.




एका अहलावानुसार, पृथ्वीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी 120 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटींचा समावेश होता.



यावेळी पृथ्वीच्या आरोग्यासाठी सुमारे 100 पंडितांनी पूजन केले. आणि जवळपास 50,000 गावकऱ्यांना अंबानी कुटुंबाने अन्न पुरवले, तसेच जवळच्या अनाथाश्रमांना आवश्यक वस्तू दान केल्या.



आता या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलकही समोर आली आहे. एका फॅन पेजने पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली आहे. यामध्ये 'छोटे शहजादे'च्या वाढदिवसानिमित्त किती केकची व्यवस्था करण्यात आली होती, हे पाहायला मिळत आहे.


पेस्टल कलर्सच्या थीमवर उपस्थित असलेले हे सर्व केक आणि कपकेक अतिशय गोंडस दिसत आहेत. यापैकी एका केकवर 'प्रिन्स पृथ्वी' असे लिहिले आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाची हा क्यूट प्रिन्स आता सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे.