मुंबई : 'कोर्ट' फेम अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. लस घेतल्यानंतर त्यांना 10 दिवसांनी कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्याचं कळताचं त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोर्ट चित्रपटातील त्यांची भूमिका तुफान गाजली होती. कोर्ट चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. पण आजही चित्रपटातील वीरा साथीदार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत  वीरा साथीदार यांचा सक्रिय सहभाग होता आणि भारतीय लोक थिएटर असोसिएशनचे संयोजक होते. साथीदार यांनी कोर्ट चित्रपटात पहिल्यांदाच अभिनय केला.  ‘कोर्ट’ सिनेमासाठी दोनशे लोकांचं ऑडीशन घेण्यात आलं होतं.  त्यांनंतर चित्रपटासाठी साथीदार यांची निवड करण्यात आली. 


चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरल्यानंतर अखेर ऑस्कर पुरस्काराची वाट धरली.  चित्रपटातील साथीदार यांच्या भूमिकेत तुफान कौतुक झालं. कोर्ट चित्रपटात त्यांनी नारायण कांबळे ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती.