Ameesha Patel Trolled: सध्या चित्रपटांचे प्रमोशन हे जोरदार चालत असते त्यामुळे त्यांची सर्वत्र एकच चर्चा रंगलेली असते. आता प्रमोशनचे फंडेही फार बदलताना दिसतात. त्यामुळे कधी कोण कशाप्रकारे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करेल याचा काहीच नेम नाही. परंतु सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला आपलं हे प्रमोशन करणं फारच महागात पडलं आहे. तिनं आपल्या आगामी चित्रपटांबद्दल एक पोस्ट शेअर केली खरी परंतु तिच्या या पोस्टमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती अमिषा पटेल आहे आणि आम्ही बोलतोय ते म्हणजे तिच्या आगामी 'गदर 2'. तिनं आपल्या आगामी चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. तुम्ही म्हणाल की असं नक्की तिला ट्रोल करायला झालंय तरी काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2001 साली आलेल्या 'गदर' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही तूफान प्रतिसाद मिळाल्याचा पाहायला मिळला. आता तब्बल 22 वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग येतो आहे. 'गदर 2' या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात 11 ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सनी देओल आणि अमिषा पटेलच्या चाहत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यावेळी या दोघांची कमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता ही जोडी परत एकदा रुपेरी पडद्यावर येते आहे. चला तर मग जाणून घेऊया की आता नक्की अशी अमीषा पटेलनं काय माती खाल्ली आहे. 


 ‘गदर: एक प्रेम कथा’या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. त्यात सनी देओलच्या स्मशानभूमीतील सीननं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते परंतु याचे रहस्य स्वत: अमिषा पटेलनं उलगडले आहे त्यामुळे तिला नेटकरी जामच ट्रोल करत आहेत. 


हेही वाचा - श्रीदेवीला टक्कर देत होती 'ही' अभिनेत्री, आता कामच मिळेना; फोटोतील चेहरा ओळखला?


या चित्रपटात सनी देओल तारा सिंग तर अमीषा पटेल ही सकीनाची भुमिका करताना दिसते आहे. त्या स्मशानभूमीच्या सीनमुळे आता सकीनाचा शेवट या चित्रपटातून दाखवला आहे का त्यामुळे सकीनाच्या जाण्यानं आता तारा सिंग तिच्या आठवणीत रडत असणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. परंतु अमीषा पटेलच्या त्या पोस्टनं मात्र पोटातलं सर्वच बाहेर काढलंय आणि मग तिचा चांगलाच पचका झाला आहे. तिनं या पोस्टमध्ये लिहिलंय की, माझ्या प्रिय फॅन्सना मला सांगायचंय की, 'तुम्हाला असंच वाटतं होतं ना की मी गदर 2 मध्ये म्हणजे सकीना मरते. पण तसं नाहीये. काय माहिती ही कदाचित सकीना नसेलच. काळजी करू नका... खूप प्रेम सर्वांना'



परंतु ही पोस्ट केल्यानं अमीषा मात्र ट्रोल झाली आहे. आधीच सस्पेन्स का रिव्हिल केलं म्हणून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.