मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. नुकतंच भोपाळ कोर्टाने अमिषावर जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. खरंतर, अभिनेत्रीवर चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासाठी अमिषाला पुढील सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिषा 4 डिसेंबरला भोपाळ कोर्टात हजर होणार आहे. अमिषावर ३२.२५ लाख रुपयांचा चेक बाऊन्सचा खटला सुरू आहे. यूटीएफ टेलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेडने  अभिनेत्रीच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने चित्रपट करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्याऐवजी 2 चेक दिले होते, मात्र आता ते दोनीही चेक बाऊन्स झाले आहेत.


अमिषाकडून कोणताही प्रतिसाद नाही
आता या प्रकरणी जर अभिनेत्री भोपाळ कोर्टात हजर झाली नाही तर तिला अटकही होऊ शकते. आता अमिषा स्वतः कोर्टात पोहोचणार आहे की, तिच्या वकिलांमार्फत उत्तर देणार आहे, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे, अमिषानेही या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.