`...म्हणून करीनाची `कहो न प्यार है`मधून झाली हकालपट्टी`; अमीषा पटेलचा गौप्यस्फोट
Ameesha Patel : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत `कहो ना प्यार है` या चित्रपटाच्या कास्टिंग विषयी खूप मोठा खुलासा केला आहे.
Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सध्या तिच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं सकीना ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटामुळे अमीषा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. आता अमीषानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून डेब्यू करण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी तिनं असं वक्तव्य केलं की तिनं चित्रपटाला नकार दिला नव्हता तर तिला चित्रपटातून काढलं होतं.
खरंतर हृतिकसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटात काम करण्याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमीषा ती या चित्रपटाचा भाग कशी झाली याविषयी सांगितलं आहे. अमीषानं ही मुलाखत बॉलिवूड बबलला दिली होती. याविषयी बोलताना अमीषा म्हणाली की 'खरंतर करीनानं चित्रपट सोडला नव्हता. राकेश जी यांनी मला या विषयी सांगितलं होतं की करीनाला चित्रपट सोडण्यासाठी सांगितलं कारण त्यांच्यात वाद सुरु झाले होते.' अमीषाचं म्हणणं आहे की करीनानं चित्रपट सोडला नाही तर राकेश रोशन यांनी चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवला.
राकेश रोशन यांचा या चित्रपटाशी काय संबंध असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर राकेश रोशन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांनी मुलगा हृतिकसोबत सगळ्यात आधी महत्त्वाच्या भूमिकेसाठी कास्टिंग केली तेव्हा त्यांनी करीना कपूरची निवड केली होती. मात्र, त्यानंतर करीना ऐवजी अमीषाला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले.
अमीषानं पुढे सांगितलं की पिंकी आंटी यांनी सांगितलं की त्यांना आश्चर्य झाले होते, कारण सेट तयार झाला होता आणि आम्हाला सोनियाच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट पुढच्या तीन दिवसात शोधायची होती. कोटींमध्ये पैसे खर्च झाले होते. हृतिकचं पदार्पण होतं आणि प्रत्येक व्यक्ती तनावात होतं. पिंकी आंटी पुढे म्हणाल्या की, त्यांनी मला एका लग्नात पाहिलं होतं. त्यानंतर त्या पूर्ण रात्र झोपू शकल्या नाही आणि सतत बोलत राहिल्या की सोनिया भेटली. फक्त तिनं होकार द्यायला हवा.
हेही वाचा : शाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी
या मुलाखती दरम्यान, अमीषानं म्हटलं की कहो न प्यार है आणि हमराज के सीक्वलविषयी बोलायचे झाले तर प्रेक्षकांना तिला या चित्रपटात पाहायचे होते, फक्त एक चांगली स्टोरीलाइन पाहिजे होती. 2020 मध्ये राकेश रोशन यांनी द क्विंटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी करीनाला का रिप्लेस करण्यात आले यामागचे कारण सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की करीनाची आई सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त लक्ष घालत होती. त्यामुळे बरं झालं तिने हा चित्रपट सोडला. करीनानं अमीषाला चित्रपटात घेण्याबाबत देखील मत मांडले होते. अमीषा या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्री नाही असे राकेश रोशन यांना म्हणाली होती.