शाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी

Shah Rukh khan and Suhana : शाहरुख खान आणि सुहाना खान या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना आता ते दोघं लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ती करणार असल्याचे समोर आले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 2, 2023, 06:17 PM IST
शाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh khan and Suhana : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा आणि रोमान्सचा किंस शाहरुख खान हा सध्या त्याच्या 'जवान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जवळ येत असल्याचे पाहता चाहत्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे त्याची लेक आणि लोकप्रिय स्टार किड सुहाना खान ही तिच्या 'द आर्चीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ते दोघे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ओटीटीवरून पदार्पण करणारी सुहाना ही फक्त तिथपर्यंतचं मर्यादीत राहणार नाही तर लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सुहाना ही वडील शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

रिपोर्ट्सनुसार, 'कहानी 2' आणि 'बदला' दिग्दर्शक सुजॉय घोष हे लवकरच एक चित्रपट घेऊन येणार आहेत. त्या चित्रपटात सुहाना आणि शाहरुख दोघेही एकत्र दिसणार आहे. तर हा एक स्पाय मुव्ही असणार आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख खानची पाहुण्या कलाकाराची भूमिका नसून महत्त्वाची भूमिका असणार आहे. शाहरुख आणि सुहाना या दोघांचे देखील महत्त्वाच्या भूमिका असतील. त्याची भूमिका ही 'डियर जिंदगी' या चित्रपटातील भूमिकेप्रमाणे असेल. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख सुजॉय घोष यांच्या या आगमी चित्रपटात सुहानाच्या भूमिकेला पाठिंबा देणारी भूमिका असणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुख खान आणि सुहाना यांच्या भूमिका कोणत्या असणार असतील? सुजॉय यांचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटात सुहाना ही एका स्पायच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रत्येक स्पायचा जसा एक हॅन्डलर असतो तसाच सुहानाचा देखील एक हॅन्डलर असणार आहे. हा हॅन्डलर दुसरा कोणी नसून तिचे वडील शाहरुख खान असणार आहे. शाहरुख या चित्रपटात सुहानाच्या हॅन्डलरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात झाल्याचे देखील म्हटले जात आहे. 

हेही वाचा : 'मासिक पाळीविषयी वडिलांना सांगताच ते म्हणाले...', मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

शाहरुखच्या जवान या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखचा एक नवा अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुखचा बाल्ड लूक पहिल्यांदा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तर सुहानाचा 'द आर्चीज' हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.