`ऐसी दिवानगी, देखी नही कभी`, मॉडेलचे खराब कपडे विकत घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड
`या` मॉडेलनं वापरलेल्या जुन्या, खराब कपड्यांनाही मिळते लाखोंची किंमत
नवी दिल्ली : एखाद्या सेलिब्रिटीनं वापरलेल्या गोष्टी, किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या वापरात असणाऱ्या वस्तूंचा लिलाव होऊन त्या लिलावात या वस्तूंना मोठी किंमत मिळते ही बाब काही नवी नाही. पण, एक मॉडेल अशीही आही जिच्या जुन्या, वापरलेल्या आणि खराब कपड्यांनाही लाखोंची किंमत मिळते. सोशल मीडियावरही या मॉडेलची बरीच चर्चा असते, जी तिच्या जुन्या कपड्यांची विक्रीनं लाखोंची कमाई करते.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वास्तव्यास असणाऱ्या 41 वर्षीय मॉडेल मार्लेसा आलोंसो तिच्या हजारो फॉलोअर्सच्या मनावर राज्य करते. जुने कपडे विकण्याच्या कल्पनेला तिनंही दुजोरा दिला आहे. आपण या माध्यमातून चाहत्यांचीच इच्छा पूर्ण करत ाहोत अशीच प्रतिक्रिया ती देते.
मिररच्या वृत्तानुसार मार्सेलानं आतापर्यंत तिच्या अनेक वापरलेल्या आणि खराब कपड्यांची विक्री केली आहे. कपड्यांची खरेदी करणाऱ्यांपैकी अनेकजण हे तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. अलोंसोच्या म्हणण्यानुसार दर दिवशी तिला अशा अनेक विनंती येतात ज्यामध्ये चाहते तिचे जुने कपडे खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतात, जेणेकरुन आपल्या आवडीच्या मॉडेलचे कपडे त्यांना आपल्याकडे ठेवता येतील.
अभिनयासाठी गडगंज पगाराची नोकरी सोडणारा 'भाभी जी घरपर है' मधील 'अनोखेलाल'
तिनं वापरलेले कपडे खरेदी करण्यासाठी लोकं वाट्टेल ती किंमत देण्यास तयार असतात. एका चाहत्यानं तर मार्सेला अलोंसोची knickers $120 म्हणजेच जवळपास 9 हजार रुपयांत खरेदी केली होती. मार्सेलाच्या मते हे कपडे जितके जास्त खराब होतात तितकी जास्त प्रमाणात त्यांची विक्री होते. एखाद्या फोटोशूटमध्ये वापरलेल्या कपड्यांच्या विक्रीची मागणी तर मोठ्या प्रमाणात केली जाते. हे प्रकरण काहीसं नवं असलं तरीही हे खरंय, ज्यामुळं त्याची बरीच चर्चाही होत आहे.