Britney Spears Conservatorship : नात्यांमध्ये आलेली वादळी अनेकदा उमगण्यापलीकडली असतात. कारणं अनेक असतात, पण तरीही इतरांना ती दुरून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं सुटणारी वाटतात. मुळात हीच लहान वाटणारी भांडणं, वाद अनेकदा मोठं रुप घेतात आणि मग नात्यांची सीमा ओलांडून सुरु होतो एक संघर्ष. अशाच एका संघर्षाला एक गायिका सामोरी गेली आणि अखेर तिचा यात विजय झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गायिका म्हणजे, ब्रिटनी स्पीअर्स. लोकप्रिय ब्रिटनीच्या वडिलांना त्यांच्या मुलीच्या गार्डिन म्हणून असणाऱ्या वादग्रस्त भूमिकेतून हटवण्यात आलं आहे. बुधवारी लॉस एंजलिस येथील न्यायाधीशांनी या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुनावला. परिणामी या पॉप गायिकेची आता एका प्रदीर्घ काळापासून सुरु असणाऱ्या एका कायदेशीर संघर्षातून मोकळीक झाली आहे. वडिलांपासून मोकळीक मिळण्यासाठी तिनं कित्येक वर्षे कायदेशीर लढाईचा सामना केला होता. 


न्यायमूर्ती ब्रेंडा पेनी यांनी जेमी स्पीअर्स यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देत ब्रिटनीच्या हितार्थ एक अस्थायी संरक्षक तैनात केला. सदर प्रकरणी संरक्षणाच्या मुद्द्यारवरुन या वर्षअखेरीस संपूर्ण निर्णय होणार असल्याचंही सांगण्यात आलं. 


ब्रिटनीचं नाव हे मागील बऱ्याच काळापासून अनेक वादांशी जोडलं गेलं होतं. कमी वयातच वाईट वर्तणूक आणि त्यानंतर वडील जेमी स्पीअर्स यांच्या संरक्षण कवचामुळं तिच्या आयुष्याला वादाचीच किनार होती. वडिलांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तिनं अनेक वर्षे कायदेशीर लढाईचा सामना केला. 


2008 मध्ये ब्रिटनी स्पीअर्सनं फेडरलाईनशी घटस्फोट घेतला, ज्यानंतर तिचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं सांगण्यात आलं. ब्रिटनीचे वडील जेमी यांनी कंजरवेटरशिपसाठी न्यायालयात अर्ज केला. ज्यानंतर ब्रिटनीच्या आरोग्यापासून ते अगदी संपत्ती आणि व्यापाराशी संबंधीत सर्वच अधिकार वडिलांकडे गेले. 


वडिलांच्या कचाट्यात सापडलेल्या ब्रिटनीनं यानंतर त्यांच्यापासून मोकळीक मिळवण्यासाठी म्हणून न्यायालयात अर्ज केला. त्यांच्यावर तिनं काही गंभीर आरोपही केले. आपल्यामध्ये आययूडी डिवाईस लावण्यात आली आहे, जेणेकरुन गर्भधारणा होणार नाही, लग्न न होण्यासाठी आणि मूल न होण्यासाठी ब्रिटनीसोबत हे सारंकाही करण्यात आल्याचे आरोप तिनं लावले होते.



आपल्याच पैशांवर आपलाच अधिकार नसल्याचं सांगत ब्रिटनीनं न्यायालयात धाव घेतली आणि आपली या जाचातून सुटका व्हावी अशी मागणी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा या सर्व गोष्टी समोर आल्या तेव्हाही ब्रिटनीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं. #FreeBritney या हॅशटॅगअंतर्गत नेटकऱ्यांनी तिला साथ दिल्याचं पाहायला मिळालं होतं.