चवीसाठी मासे खाता?आता पोषक शरीरासाठीसूद्धा खा.पाहा कमाल फायदे

केसांसाठी मासे फायदेशीर असतात, हे आपण सगळे जाणून आहोतच. मात्र माशांचे असे अनेक फायदे आहेत जे आपल्याला ज्ञात नाहीत. पाहा मासे खाण्याचे कमाल 5 फायदे.

Sep 28, 2024, 16:45 PM IST

मासे हे समुद्रकिनारी, नदीकाठी राहणाऱ्या लोकांचे मुख्य अन्न आहे. आपण आवडीने मासे खात असतो पण माशांचे सेवन करणे शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?  

1/8

मत्स्यप्रेम

भारतात मत्स्यप्रेमींची संख्या मोठी आहे. नदीतले मासे, समुद्रातले मासे असे वेगवेगळे मासे, भारतातल्या विविध भागांत खाल्ले जातात. अनेक मंडळी चवीसाठी मासे खातात. 

2/8

चवीष्टही आणि पोषकही

मासे फक्त चवीष्टच नाही तर, शरीरासाठी पोषकदेखील असतात. माश्यांमध्ये हाय कॉलिटी प्रोटीन,ओमेगा-3 ,विटामिन-डी, आयोडीन, फैटी अॅसिड अशा विविध पोषक घटकांचा समावेश असतो. 

3/8

अमेरिका हार्ट एसोसिएश

अमेरिका हार्ट एसोसिएशनने सांगितल्याप्रमाणे, आठवड्यातून दोनदा मास्यांचे सेवन केले तर, शरीराला खुप फायदा होईल. आहारात मासे समाविष्ट करण्याचे महत्त्वाचे फायदे नक्की काय आहेत?

4/8

बुद्धिसाठी फायदेशीर

माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असते, जे तल्लख बुद्धीसाठी फायदेशीर आहे. माणसाच्या डोक्यात मेम्ब्रेन एन-3 FAs असते त्यासाठी मासे पोषक असतात. वयपरत्त्वे होणाऱ्या स्मृतीभ्रंशाची शक्यता मासे खाल्याने कमी उद्भवते. 

5/8

कमी ताणतणाव

मासे खाणे फक्त शारिरीकच नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे. यामुळं ताण,चिंता, काळजी, आदी कमी करते.

6/8

ह्रदयाची निरोगता

निरोगी ह्रदयासाठी मासे उत्तम असतात. ओमेगा-3 ट्राइग्लिसराइडस या अभावाची शक्यता मासे खाल्ल्याने कमी होते. 

7/8

अस्थमापासून सुटका

आता मासे फक्त चवीसाठी नाही तर ,अस्थमापासून  वाचण्यासाठीसुद्धा खा. फक्त अस्थमा नाही, तर सीओपीडी आणि इंफ्लेमेंट्री बाउल नामक आजारापासूनही बचाव करता येतो. विविध त्त्वचारोगांना माशांमधील गुणधर्म आपल्या शरीरापासून दूर करतात. 

8/8

स्पष्ट टृष्टी

वैद्यकीय तज्ज्ञसुद्धा हे मान्य करतात की, मासे डोळ्यांसाठी चांगले असतात. दृष्टीक्षमता सुधारण्यासाठी डीएचए आणि ईपीए ची गरज असते. साल्मन, टूना, ट्राउट अशा माशांमध्ये हे घटक प्रामुख्यानं आढळतात.