मुंबई : फास्टर फेणे म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता अमेय वाघ आता नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. सगळीकडेच आता वेब सीरिजची जास्त चर्चा आहे. अशातच अमेय वाघ नवीन वर्षात आपल्याला एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी नाटकं, सिनेमे आणि टीव्ही मालिकांमधून भेटणारा अमेय आता आपल्याला हिंदी-इंग्रजी अशा वेब सीरिजमधून भेटणार आहे. 



या वेबसीरिजमध्ये अमेय महत्त्वाची भूमिका साकारत आहे. थ्रिलर वेबसीरिजमध्ये काम करण्याचा अमेयचा हा पहिलाच अनुभव आहे. 


हिंदीमधील नावजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या 'असुरा' या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी प्रमुख भूमिका साकारत आहे. वेब हे माध्यम अमेयसाठी नवीन नाही. अमेय आणि निपुण ही जोडी ‘भाडिपा’मुळे आधीच वेब फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. तर आता अमेय एका हिंग्लीश वेबसिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत आहे.