‘फाफे’साठी कमी केलेले वजन अमेय वाघ पुन्हा वाढवतोय
प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो.
मुंबई : प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो.
मग तो भूमिकेचा सगळया बाजूनी केलेला अभ्यास असो किंवा भूमिकेसाठी गरजेचा असणारा 'फिट टू फॅट' आणि 'फॅट टू फिट' लूक असो... चित्रपट, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी गरज असल्यास वजन वाढवतात देखील आणि कमीही करतात. अर्थात योग्य मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया चालू असते. यासाठी नुकतेच एक हटके उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांचाच आवडता अभिनेता 'अमेय वाघ'.
रितेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'फास्टर फेणे' चित्रपटातील 'बणेश फेणे' च्या भूमिकेतून प्रत्येकाला 'य' मजा घ्यायला मिळावी यासाठी आणि 'फाफे' साठी अमेयने जवळपास १०-११ किलो वजन कमी केले होते. आणि आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी अमेय कमी केलेलं वजन पुन्हा एकदा वाढवतोय. वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’साठी देखील अमेयने वजनावर लक्ष दिले होते.
परुळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अमेयने ज्याप्रमाणे १०-११ किलो वजन कमी केले त्याचप्रमाणे आता वजन वाढवून आगामी भूमिकेसाठी पुन्हा एकदा तयार होतोय. नियमित व्यायाम, सकस आहार घेऊन अत्यंत सात्विक पद्धतीने वजन वाढवणाऱ्या अमेयचा आगामी चित्रपट कोणता याविषयी जाणून घेण्यास नक्कीच सर्वांना उत्सुकता असेल.
पण हे मात्र नक्की की वजन कमी करून जसा 'फास्टर फेणे' सुपर डुपर हिट झाला तसाच हा चित्रपट पण सुपरहिट होणार.