अमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
मुंबई : दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अमेय वाघनंच त्याच्या फेसबूक पेजवर ही घोषणा केली आहे.
अमेय वाघचं त्याची प्रेयसी साजिरी देशपांडेसोबत लग्न होणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून ती मला सहन करत आहे. तरीही यापुढे आपण आनंदी राहू असा विश्वास तिला आहे, असं फेसबूक पोस्ट अमेयनं केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका आणि नुकताच रिलीज झालेला मुरांबा या चित्रपटामुळे अमेयची तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या तरुणींचा मात्र अमेयच्या या फेसबूक पोस्टमुळे नक्कीच हिरमोड झाला असेल.