ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान सुष्मिता सेनची प्रतिक्रिया
सुष्मिता सेनची यावर महत्वाची प्रतिक्रिया
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) सोशल मीडियावर कायम रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात. याच दरम्यान या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनने आपल्या रिलेशनशिपबद्दल एक पोस्ट देखील केली होती. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. रोहमन आणि सुष्मिता यांचं ब्रेकअप होत आहे का? अशी चर्चा रंगली.
आता पुन्हा एकदा या चर्चा रंग धरू लागल्या आहेत. रोहमनने एक कविता पोस्ट केली आहे. ज्या कवितेवर सुष्मिता सेनने कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. रोहमनने आपल्या इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हटलंय रोहमनने
रोहमन आपल्या या इंस्टाग्राम पोस्टवर लिहितो की,''उस वक्त, उस जगह, जहां मुझे लगा मैं अकेला हूं, वहां मुझे इस पेड़ का साथ मिला। इसे अब मैंने कैद कर लिया है, और अकेलेपन से रिश्ता गैर कर लिया है। --RS #rohmanclicks #rohmanwrites #rohmanfeels #serenity
तो म्हणतोय की, त्यावेळी, त्या ठिकाणी, जेव्हा मला वाटलं मी एकटा आहे. तेव्हा मला या झाडाची सोबत मिळाली. आता याला मी माझ्याकडे कैद केलंय आणि एकटेपणाशी नातं दूर केलं आहे. रोहमनच्या या कवितावर सुष्मिता सेनने प्रतिक्रिया दिली आहे. 'उफ्फ जान, बात तो है|' यासोबतच त्यांनी इमोटिकॉन पोस्ट केलं आहे. सुष्मिताच्या कमेंटवर रोहमने प्रतिक्रिया दिली आहे. 'संगति का असर है|'
सुष्मिताने पोस्टनंतर ब्रेकअपची चर्चा
सुष्मिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वियना फॅरोन (Vienna Pharaon) चा कोट लिहिला आहे.