मुंबईः आमीर खान सध्या त्याच्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कोविडच्या महामारीमुळे त्याचा हा चित्रपट दुर्दैवाने रिलिझ होऊन शकला नव्हता. त्यातून चार वेळा या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. मध्यतंरी घाबरून आमीरने त्याचा हा नवाकोरा चित्रपट साऊथ इंडियन रिलिझसोबत क्लॅश होऊ नये म्हणून 'लाल सिंग चढ्ढा'चे रिलिज एक नाही चार वेळी बदलले. त्यात 'आरआरआर' या एस. एस. राजमौली यांच्या चित्रपटाही समावेश होता आता अक्षयच्या 'रक्षाबंधन' या चित्रपटासोबत हा चित्रपट क्लॅश होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाल सिंग चढ्ढा' हा सिनेमा हॉलीवूडचा रिमेक आहे. 'द फॉरेस्ट गंप' या अजरामर मूव्हीचा तो रिमेक आहे. जो ऑगस्टमध्ये रिलिज होणार आहे. 


मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' याच चित्रपटामुळे बिझी आहे. तरी तो सध्या फारसा मीडियासमोरही येत नाहीये. शेवटचा तो मीडियासमोर त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आला होता. पण आता तो मीडियासमोर आला आहे ज्याचे कारणही फार खास आहे. सध्या आमीरचा एक आगाळाच व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ खरोखरच खास आहे. लाखो लोकांनी तो काही मिनिटांच ट्विटरवर पाहिला आहे.


नुकताच आमिर खान हा त्याच्या साऊथ सुपरस्टार मित्रांना 'लाल सिंग चड्ढा'च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी हैद्राबादला घेऊन गेला होता. सुपरस्टार चिरंजीवीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आमिर खान भावूक होताना दिसत आहे. या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये नागार्जुन, एसएस राजामौली, सुकुमार आणि नागा चैतन्य यांसारखे मोठे स्टार्स दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या दिग्गजांना आपला ड्रीम प्रोजेक्ट 'लाल सिंह चड्ढा' दाखवल्यानंतर आमिर खान भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. या भावनिक क्षणी चिरंजीवीने लगेच आमिर खानला मिठी मारली. चिरंजीवीने व्हिडिओ शेअर करताना लाल सिंह चड्ढाचा पहिला रिव्ह्यू दिला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'लाल सिंह चड्ढा' चे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त नागा चैतन्य, करीना कपूर, मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.