23 वर्ष निनावी आयुष्य जगत होती `राजा हिंदुस्तानी`ची हिरोईन, विवाहीत पुरुषाच्या प्रेमात संपवलं स्वत:चं करिअर
`मेहबूब मेरे मेहबूब` या सिनेमातून प्रतिभाने आपल्या करिअरला सुरुवात केली. खरंतर त्याचं स्क्रिनवरील करिअर खूप कमी वेळासाठी होतं. 13 सिनेमांमध्ये प्रतिभा यांनी कामं केली.
मुंबई : 25 वर्षांआधी आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या 'राजा हिंदुस्तानी' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा यांनी आता वयाची 51 वर्ष पुर्ण केली आहेत. 'परदेसी परदेसी' या गाण्यात त्यांनी केलेल्या नृत्याला खूप पसंती मिळाली होती. पर 4 जुलै 1969 मध्ये कोलकता येथे त्यांचा जन्म झाला. प्रतिभा सिन्हा प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा यांची लेक आहे.
'मेहबूब मेरे मेहबूब' या सिनेमातून प्रतिभाने आपल्या करिअरला सुरुवात केली. खरंतर त्याचं स्क्रिनवरील करिअर खूप कमी वेळासाठी होतं. 13 सिनेमांमध्ये प्रतिभा यांनी कामं केली.
प्रतिभा सिन्हा म्यूझिक डायरेक्टर नदीम सैफीसोबतच्या अफेअरमुळे चांगल्याच चर्चा होत्या. विवाहीत नदीम सैफीच्या प्रेमात प्रतिभा एवढ्या बुडाल्या होत्या की त्यांनी आपल्या करिअरचा ही विचार केला नाही. प्रतिभा यांनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. सुरुवातीला नदीमसोबत लग्न करणार असल्याचं प्रतिभा सिन्हानं म्हटलं.पण नंतर लग्न करणार नसल्याचं ही सांगितलं. प्रतिभा यांची आई माला सिन्हा या दोघांच्या नात्याच्या विरोधात होत्या.
नदीमवर गुलशन कुमार यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे नदीम आणि प्रतिभा कोड वर्डमध्ये बोलायचे. प्रतिभा 'Ambassador' कोड तर नदीमचा 'Ace' हा कोड वापरतं होता. प्रतिभाच्या आईला जेव्हा दोघांच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी मुलीला थांबवण्याचा ही प्रयत्न केला. बोललं जातं की, माला सिन्हा यांनी नदीमच्या घरी फोन करुन शिव्या-गाळ केली होती. पण प्रतिभा यांनी आपल्या आईच्या बाजूने नदीमची माफी मागितली होती.
प्रतिभा सिन्हा यांनी शेवटचं 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'मिलिट्री राज' या सिनेमात काम केलं. सध्या ती आई माला सिन्हासोबत राहत असल्याचं बोललं जातंय.