मुंबई : सोशल मीडियावर अनेक स्टार्सचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. यात काही त्यांचे लेटेस्ट फोटो असतात तर काही जुने फोटो असतात. दरम्यान हे जूने फोटो व्हायरल झाल्यानंतर या स्टार्सना ओळखण अवघड जातं. असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतली अभिनेत्री तुम्हाला ओळखता येतेय का पाहा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत काय?
अभिनेत्रीचा हा फोटो शाळेतला आहे. वर्गातील मुलां-मुलीसोबत ही अभिनेत्री बसलीय. बालपणीच्या फोटोत अभिनेत्री दोन पोनी घालून कॅमेरात बघत आहे. या मुलीच्या आजूबाजूला तिच्या वर्गातील विद्यार्थी आहेत जे मॅडमसोबत फोटो काढत आहेत. त्यामुळे चित्रात दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे हे तुम्ही ओळखू शकता का?


या चित्रात दिसत असलेल्या मुलीला दोन वेण्या आहेत आणि त्यावर काळ्या रंगाची रिबन बांधलेली आहे.मोठं होऊनही या अभिनेत्रीने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्रीने आमिर खानसोबत एक सुपरहिट चित्रपटही दिला, ज्याची खूप चर्चा झाली होती. 


दोन वेण्या असलेली ही गोंडस मुलगी दुसरी कोणी नसून असीन आहे. असिन आमिर खानसोबत 'गजनी' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात आमिर खान आणि असीनची प्रेमकहाणी आणि चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली होती.


या चित्रपटानंतर असिन अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये 'खिलाडी 786', 'बोल बच्चन', 'हाऊसफुल 2' आणि 'रेडी'चा समावेश आहे. सध्या असिन लग्नानंतर चित्रपटांपासून दूर आहे. असिनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले होते.