Amir Khan vs Shahrukh Khan : मिस्टर पर्फक्शनिस्ट आमीर खान आता आपल्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटातून चार वर्षांनंतर पदार्पण करत आहे.  'ढग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा बीग स्क्रीनवर कमबॅक करतो आहे. वर्षाला एकच चित्रपट करणारा हा अभिनेता बॉलीवूडच्या मोठमोठ्या अवॉर्ड शोलाही फारच कमी जाताना का दिसतो? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. पण त्यामागे एक मोठं कारण असून स्वतः आमीरही त्यावर बोलणं टाळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्ष झाली पण आमिर खानला अवॉर्ड फंक्शनला जाताना कोणीच पहिले नाही. तो कधीही कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे खुद्द आमिर खानचीच नाराजी. आमिर खान त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी किती मेहनत घेतो. तो पूर्ण वेळ त्याच्या पात्राला समजून घेतो आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करतो त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणले जाते. पण असेही बोलले जाते की आमीर खानची नाराजी ही त्याला अवॉर्ड न मिळाल्याने अधिक वाढली होती त्यामुळे कुठल्याही अवॉर्ड फंग्शनला तो जाणं टाळतो. 


आमिर खानचा 'रंगीला' हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफसारखे कलाकार होते. केवळ 3.5 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 34 कोटींची कमाई केली होती. आमिर खानने मुन्ना नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि त्याची अभिनय शैली त्यावेळी खूप लोकप्रिय ठरली होती.  


तेव्हा आमीरला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नक्की मिळेल असे सगळ्यांना वाटले होते पण आमिरला पुरस्कार मिळाला नाही. त्याचवेळी  शाहरुखचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ज्या वर्षी रंगीला रिलीज झाला होता. तेव्हा शाहरूख खानला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे आमीरला याचा फारचा राग आला होता आणि ती गोष्टही आमीरच्या मनाला लागली होती. 


पुरस्कार न मिळाल्याने आमीरला प्रचंड दुःख झाले होते आणि त्यावेळेपासून आमीरने कुठल्या पुरस्कार सोहळ्यात न जायचा निर्णय घेतला होता. त्याने यापुढे कधीही कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला न जाण्याची शपथ घेतली आणि ते वचन त्यांनी आजपर्यंत पाळले आहे.