मुंबई : अभिनेत्री अमिषा पटेल बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे हॉट फोटो शेअर करत असते. दरम्यान, सध्या अभिनेत्री फैजल पटेलसोबतच्या नात्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर, अमिषा पटेल तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली होती जेव्हा, तिला फैजल पटेलने जाहीरपणे लग्नासाठी प्रपोज केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रस्तावापूर्वी अमिषाने फैसलच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. ज्या पोस्टमुळे दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. त्यानंतर फैजलने लग्नाच्या प्रपोजलची पोस्टही डिलीट केली. आता अमिषा पटेलने या संपूर्ण प्रकरणावर मौन तोडलं असून तिचं आणि फैसल पटेलचं नातं काय आहे हे सांगितले आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, 'मी आणि फैजल अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो.


त्याची बहिण माझी मैत्रीण आहे. शेअर केलेली ही पोस्ट फक्त एक विनोद होता. त्यापेक्षा जास्त काही नाही. मी अविवाहित आहे आणि अविवाहित असल्याचा मला आनंद आहे. मला सध्या कोणत्याही नात्यात रस नाही. फैझल ही अशी व्यक्ती आहे ज्याला असे विनोद करणं आवडतं.


अमीषा म्हणाली की, तिचा अजून लग्नाचा कोणताही प्लॅन नाही. ती म्हणाली, 'मला माहित आहे की, अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहेत, पण या शर्यतीत सहभागी होण्याचा माझा कोणताही विचार नाही. मी अविवाहित राहून माझ्या स्वतःच्या इच्छेनुसार माझं काम करण्यात आनंदी आहे. मला वाटतं की रिलेशनशिपमध्ये असणं भावनिकदृष्ट्या  खूप थकवणारं आहे. सध्या माझ्याकडे त्यासाठी वेळ नाही.


अमिषाचं नाव कुणासोबतही जोडलं जाण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. याआधीही अमिषाच्या रिलेशनशिपचे किस्से खूप व्हायरल झाले आहेत. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत तिचं नाव बऱ्याचदा चर्चेत राहिलं आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अमिषा सध्या सनी देओलसोबत 'गदर 2' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे.