बिग बींनी शोधला मास्कला हिंदी शब्द; एकदा बोलून तर बघा
`अखेर मास्कला हिंदी शब्द शोधलाच...`
मुंबई : बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ते नेहमी काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. अमिताभ बच्चन यांचा केवळ अभिनयचं जबरदस्त नाही तर त्यांचा आवाजही भारदस्त आहे. त्याचं हिंदी भाषेवरचं प्रभुत्वही, उच्चारही जबरदस्त आहे. आता बिग बींनी एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी एका दररोज वापरातल्या वस्तूच हिंदी भाषांतर त्यांच्याच मजेशीर शैलीत सांगितलं आहे.
बिग बींनी केलेलं ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. बिग बींनी 'अखेर मास्कला हिंदी शब्द शोधलाच...नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रादोरीकृतचित्तितिका!' असं ट्विट केलं आहे.
मास्कचा हिंदी शब्द सांगत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी 'गुलाबो सिताबो'चा मास्क घातलेला दिसत आहे.
शूजीत सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सिताबो' काही दिवसांपूर्वीच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.