नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या ऑनस्क्रीन आठवणी अनेकदा शेअर करतात. अशीच एक आठवण त्यांनी आताही शेअर केली. ही आठवण शेअर करताना त्यांनी लिहिले की, माझी ही आठवण माझ्या चाहत्यांशी शेअर केल्याशिवाय राहू शकलो नसतो. 


काय आहे ती आठवण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुलोचना लाटकर यांनी अनेक सिनेमांत अमिताभ यांच्या सोबत काम केले. बीग बींची ऑनस्क्रीन आई म्हणून त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली. त्यांनी अमिताभ यांच्यासाठी लिहिलेले एक पत्र बीग बींनी शेअर केले आहे. ते पत्र शेअर करताना त्यांनी लिहिले की, सुलोचना यांनी अनेक सिनेमात माझ्या आईची भूमिका साकारली. त्यांचे प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद नेहमीच मला मिळत राहिला आहे. मात्र माझ्या ७५ व्या वाढदिवसाला त्यांनी मला जे पत्र भेट म्हणून दिले त्याने मी भारावून गेलो आहे. त्यामुळे हे पत्र शेअर केल्याशिवाय मी राहू शकलो नसतो. सुलोचना यांनी या पत्रात लिहिले की, आज तुम्हाला ७५ वर्ष पूर्ण झाली. मराठीत या वर्षपूर्तीला अमृतमहोत्सव म्हणतात. तुम्हाला अमृत चा अर्थ माहित आहे. आयुष्यभर ही अमृतधारा अशीच वाहत राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना.


या पत्रात सुलोचनाजी पुढे लिहितात, मला अजूनही रेश्मा आणि शेरा या सिनेमातील लाजाळू छोटू आठवत आहे. आणि जेव्हा मी या छोटूचे आजचे पहाडासारखे मजबूत आणि विशाल रुप पाहते, तेव्हा मला ईश्वराच्या साक्षात्कारावर विश्वास बसतो. 
सुलोचना लाटकर आणि अमिताभ बच्चन यांनी मुकंद्दर का सिकंदर. मजबूर, रेश्मा आणि शेरा या सिनेमात एकत्र काम केले आहे.