मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. महानायक अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी चहावर आधारित एक कविता ट्विटरवर शेअर केली होती. बिग बींनी ही कविता चोरल्याचा आरोप एका महिलेने केला होता. ‘ही कविता आपण लिहिली असून बिग बींनी ही कविता शेअर करत साधं क्रेडिटदेखील दिलं नाही’, असं टीशा अग्रवालचं म्हणण होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीशा यांनी बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी मत व्यक्त केलं होतं. या महिलेच्या तक्रारीनंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे या महिलेची माफी मागितली आहे. या कवितेचे मूळ कवी माहित नसल्यामुळे ही चूक झाल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट केलंय. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काय म्हटलंय? पाहुया-


'या ट्विटचं श्रेय टीशा अग्रवाल यांनी दिलं पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला ठावूक नव्हतं. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटली त्यामुळे मी ती पोस्ट केली होती. मला माफ करा'
त्या महिलेची माफी मागितल्यानंतर सध्या महानायक अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.