मुंबई : असं काय कारण आहे की, आजही अमिताभ बच्चन यांच एक वेगळं वलय आहे. अमिताभ बच्चन असा एक त्यांचा स्वतःचा ऑरा आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आले - गेले पण अमिताभ बच्चन यांच वेगळं स्थान बॉलिवूडमध्ये कायमच राहिलं आहे. पण अमिताभ बच्चन यांना ही जागा अगदी सहज मिळाली आहे. त्यांना देखील बॉलिवूडमध्ये हे स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सुरूवातीचा काळ त्यांचा देखील अतिशय खडतर होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिअरची सुरूवातच मुळात संघर्षाने झाली या काळात अनेक चढ-उतार आले. खूप कमी लोकांना माहित आहे की, बिग बी त्यांच्या शानदार आवाजामुळे ओळखले जातात पण हेच बच्चन आकाशवाणीच्या बातम्या वाचनाची परिक्षेत असफल ठरले होते. बिग बी कधीही सिनेमांत काम मागण्यासाठी जात तेव्हा त्यांना रिजेक्ट केलं जात असे कधी त्यांच्या उंचीवरून तर कधी त्यांच्या आवाजावरून. 


हे आहे खरं कारण?


दिग्दर्शकांच असं म्हणणं होतं की, इतक्या बारिक आणि उंच मुलाला सिनेमात कोण घेणार. हे काही पडद्यावरच्या क्वालिटी नाहीत. प्रेक्षक यांना पसंद करणार नाहीत. त्यानंतर त्यांनी 'सात हिंदुस्तानी' आणि 'रेश्मा और शेरा' यासारख्या सिनेमांत छोटे छोटे रोल केले. 


सुरूवातीच्या काळातील त्यांची अनेक सिनेमे फ्लॉप झाले. त्यांना पहिलं यश हे प्रकाश मेहरा यांच्या 'जंजीर' सिनेमातून मिळालं. प्रकाश मेहरा यांनी हॉलिवूडच्या एका दिग्दर्शकाची गोष्ट ऐकली होती. ती म्हणजे बारिक आणि उंच असलेल्या व्यक्तीच्या हातात बंदूक द्या - तो सिनेमा नक्की सुपरहिट होईल. आणि अगदी तसंच झालं. आणि अशा पद्धतीने पडद्यावर अँग्री यंग मॅन अवतरला. या सिनेमाने आणि बिग बी यांनी बॉलिवूडची दिशाच बदलून टाकली. त्यानंतरच अमिताभ बॉलिवूडचे 'महानायक', 'बिग बी', 'बॉलिवूडचे सरताज', 'शहंशाह' आणि एका ब्रँडच्या रुपात समोर आले.