मुंबई : अमिताभ बच्चन आणि कुटुंबियांनी सोमवारी मोकळा श्वास घेतला. ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमिताभ यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. १० दिवस रूग्णालयात दाखल झाल्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याला डिस्चार्ज मिळाला आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, हॉस्पिटलला जाताना आराध्या आजोबांना भेटायला गेली, तिने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली तुम्ही रडू नका असं म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या आणि आराध्या कोरोनावर मात करत घरी आल्या आहे. मात्र अद्याप अमिताभ आणि अभिषेक बच्चन हे कोरोनामुक्त होऊन घरी आलेले नाहीत. अमिताभ आणि अभिषेक दोघंही अद्याप नानावटी रुग्णालयात आयसोलेशन विभागात ऍडमिट आहेत. 



सून आणि मुलगी दोघीही कोरोनावर मात करून घरी सुखरूप पोहोचल्यामुळे बिग बींचा आनंद गगनात मावत नाही. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आहे. अमिताभ यांनी ट्विट केलं आहे की, माझी नात आणि सून कोरोनावर मात करून घरी आल्यामुळे मी माझा आनंद रोखू शकलो नाही. देवा मी तुमचे मनापासून आभार मानतो.