मुंबई : आज विजयादशमीचा सण आहे. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे विजयादशमीच्या शुभेच्छा देत आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही फेसबुकवर त्यांच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. परंतु त्यांना ही पोस्ट करणं महागात पडलं आहे. कारण यामुळे त्यांच्यावर ट्रोलर्सनी निशाणा धरला, ज्यानंतर अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली आहे.  खरेतर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे एक फोटो पोस्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्ट शेअर करताना त्यांनी फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की "दशहेरा की अनेक अनेक शुभकामनाएं". अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर टिप्पणी करताना राजेश कुमार नावाच्या एका युजरने लिहिले, "सर !! खुदा गवाह मधील एका सिनमध्ये तुम्ही 'पेशेवर मुजरिम' ऐवजी 'पेशावर मुजरिम' बोलताना दिसता. तुम्ही एका महान कवीचा मुलगा आहात, त्यामुळे दशाननच्या पराभवामुळे या दिवसाला 'दशहरा' म्हणतात,  'दशहेरा' नाही. व्यावसायिक जाहिरात बाजूला ठेवा, कमीतकमी शुद्धलेखनाबद्दल सावधगिरी बाळगा."


इतर अनेक वापरकर्त्यांनीही या पोस्टवर टिप्पणी केली आणि अमिताभ बच्चन यांना त्यांच्या या चुकीबद्दल सांगितले. तर काही वापरकर्त्यांनी अमिताभ बच्चन यांचे समर्थन केले आणि राजेश कुमार यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.


त्याचबरोबर राजेश कुमार यांच्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, "राजेश कुमार, जी चूक झाली आहे, त्याबद्दल मी दिलगीर आहे आणि मी ते दुरुस्त करेन. हे दाखवल्याबद्दल धन्यवाद."



अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे हिंदी साहित्यात मोठे नाव आहे आणि त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. त्याच वेळी, अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट उद्योगाचे एक नाव आहे, ज्यांच्या उल्लेखा शिवाय कदाचित आपल्या देशाचा चित्रपट इतिहास पूर्ण होणार नाही. हेच कारण आहे की, लोकांना अमिताभ बच्चन यांची कोणतीही चूक लवकरच लक्षात येते. 


आता दसऱ्याच्या शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन यांची हिंदी चूक लगेच वापरकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यावर नाराजीही व्यक्त केली.


अलीकडेच अमिताभ बच्चन पान मसालाच्या जाहिरातीत दिसले. यासाठीही त्याला टीकेला बळी पडावे लागले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पान मसालाची जाहिरात करण्यास नकार दिला आहे.