`या` चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनाही द्यावी लागली लूक टेस्ट
सिनेक्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी कलाकाराला अनेकदा स्क्रीन टेस्ट आणि ऑडिशन द्यावी लागते. मात्र जसजसा या क्षेत्रातील प्रभाव वाढतो तसा कलाकारांना ऑडिशन, स्क्रीन टेस्ट यांचा सामना करावा लागत नाही. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा समजले जात असले तरीही एका प्रोजेक्टसाठी स्क्रीन टेस्ट द्यावी लागली होती.
मुंबई : सिनेक्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी कलाकाराला अनेकदा स्क्रीन टेस्ट आणि ऑडिशन द्यावी लागते. मात्र जसजसा या क्षेत्रातील प्रभाव वाढतो तसा कलाकारांना ऑडिशन, स्क्रीन टेस्ट यांचा सामना करावा लागत नाही. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा समजले जात असले तरीही एका प्रोजेक्टसाठी स्क्रीन टेस्ट द्यावी लागली होती.
वेगवेगळ्या भावभावनांचे चेहरे बनवत, ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्वरूपातील एक फोटो बीग बी अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केला आहे.
काय केले पोस्ट
अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार ' मी आगामी चित्रपटासाठी तयार आहे. लूक टेस्ट देत आहे. या चित्रपटामध्ये खूप लूक्स असतील. अनेक भाव असणार्या या चित्रपटाबद्दलच्या नावाबद्दल किंवा पटकथेबद्दल मात्र कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
बीग बींचे प्रोजेक्ट
बीग बींकडे सध्या १०२ नॉट आऊट, ठग्स ऑफ हिंदोस्तान, ब्रम्हास्त्र हे चित्रपट आहेत. यामध्ये आता अजून एका नव्या चित्रपटाचा समावेश झाला आहे.
१०२ नॉट आऊटमध्ये अमिताभ बच्चन ऋषी कपूर यांच्यासोबत काम करणार आहेत. तर ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये आमिर खान आणि बीग बी पाहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.