Amitabh Bachchan यांना दिग्दर्शकानं चक्क भेट दिली होती Rolls Royce, VIDEO समोर
Amitabh Bachchan यांच्या कारच्या कलेक्शनमध्ये अनेक लक्झरीयस गाड्या आहेत... त्यात सगळ्यात जास्त प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी गाडी होती ती म्हणजे रोल्स रॉयस
Amitabh Bachchan Rolls Royce : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ यांनी आता पर्यंत जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ यांची लग्झरीयस लाइफस्टाईल तर सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यांचे बंगले ते त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन. बिग बींच्या गॅरेजमध्ये विविध प्रकारच्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. अमिताभ यांच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये एसयूव्ही देखील आहेत. अमिताभ यांच्या 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'एकलव्य' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांना चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी भेट म्हणून अमिताभ यांना एक खास गोष्ट भेट म्हणून जिसी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विधू विनोद चोप्रा यांनी नक्की काय दिलं असेल. चला तर जाणून घेऊया...
विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ यांना भेट म्हणून रोल्स रॉयस फँटम (Rolls Royce Phantom) ही लक्झरी सेडान कार गिफ्ट केली होती. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. WildFilmsIndia ने त्यांच्या YouTube चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत विधू विनोद चोप्रा हे रोल्स रॉयस सेडान भेट देत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये विधू विनोद चोप्रा त्यांच्या आईसोबत दिसत आहेत. उपस्थित असलेले सगळेच अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे. पुढे अमिताभ हे त्यांच्या लेक्सस एसयूव्हीमध्ये कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचतात. अमिताभ गाडीतून उतरतात आणि विधू विनोद चोप्रा आणि त्यांच्या आईकडे चालत जातात.
हेही वाचा : आधी भैया आणि आता 'सैय्या'..., रजिस्टर मॅरेजनंतर Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर
अमिताभ आणि विधू विनोद चोप्रा एकमेकांशी बोलतात आणि त्यानंतर विधू यांची आई नवीन रोल्स रॉयस गाडीच्या चाव्या दिल्या. जेव्हा या गाडीला अमिताभ बघतात त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हा दिसून येत आहे. अमिताभ यांना गाड्या आवडतात आणि त्यात देखील महागड्या गाड्या त्यांना आवडतात. एकलव्य या चित्रपटात केलेल्या अभिनयानंतर बिग बींना मिळालेली ही भेटवस्तू खूप मोलाची होती. त्यानंतर अमिताभ आणि विधू विनोद चोप्रा यांनी मीडियाशी संवाद साधला आणि आईसोबत कारमधून बाहेर आले.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याकडे ही कार अनेक वर्षे होती, त्यानंतर त्यांनी ही कार विकली. बेंगळुरूमधील आघाडीच्या भंगार व्यापारी युसूफ शरीफ यांना बिग बींनी ही रोल्स रॉयस फँटमची विकली. त्यांच्या क्षेत्रात युसूफ शरीफ हे 'गुजरी बाबू' म्हणून ओळखले जातात. तो सार्वजनिक लिलावात सरकारकडून फायदेशीर मालमत्ता आणि यंत्रसामग्री खरेदी करतो. राजकारणातही ते सक्रिय आहेत.