Agastya Nanda Video : अगस्त्य नंदाने प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या हटके शुभेच्छा, चाहत्यांना आठवले अमिताभ बच्चन!
Agastya Nanda playing National Anthem : अगस्त्यने नुकतंच इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे आणि आज प्रजासत्ताक दिनी त्याने आपलं आणखी एक कौशल्य दाखवलं. त्यामुळे सर्वांना बिग बी यांचीच (Amitabh Bachchan) आठवण आलीये.
Agastya Nanda Video : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) याने बॉलिवूड इंडस्ट्रीत फक्त एकच चित्रपट केला असेल, पण त्याची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. झोया अख्तरच्या द आर्चीजमधून करिअरची सुरुवात केली. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूरनेही या चित्रपटातून डेब्यू केला होता. अगस्त्यने नुकतंच इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे आणि आज प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) त्याने आपलं आणखी एक कौशल्य दाखवलं. त्यामुळे सर्वांना बिग बी (Amitabh Bachchan) यांचीच आठवण आलीये.
अगस्त्य नंदा याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Agastya Nanda Video) एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्याच्या माउथ ऑर्गनवर राष्ट्रगीत वाजवताना दिसतोय. अभिनेत्याने निळ्या कॉलरचा टी शर्ट परिधान केलाय आणि सहजतेने तो राष्ट्रगीत वाजवताना दिसतोय. त्याने तिरंगा इमोजीसह त्याच्या इन्टाग्राम स्टोरीवर (Agastya Nanda Instragram) व्हिडिओ शेअर केलाय.
पाहा Video
श्रीराम राघवन यांनी आगामी चित्रपटात अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारण्यासाठी अगस्त्य नंदाला कास्ट केलंय. तर धर्मेंद्र त्यांचे वडील एमएल खेत्रपाल यांची भूमिका साकारणार आहेत. या तरुण अभिनेत्याने श्रीरामसोबत अभिनय कार्यशाळांमध्ये परिश्रमपूर्वक हजेरी लावली होती. अगस्त्यची देहबोली सुधारण्यासाठी आणि भारतातील प्रतिष्ठित युद्ध नायक, अरुण खेत्रपाल यांच्या पात्राला मूर्त रूप देण्यासाठी अभिनय प्रशिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण घेतलंय.
श्रीराम राघवन म्हणतात...
अगस्त्य नंदाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा, सात हिंदुस्तानी (1969) आणि आनंद (1971) यांसारख्या त्यांच्या चित्रपटांमधील तरुण अमिताभ बच्चन यांची आठवण आली. अगस्त्यमध्ये एक विशेष आकर्षण आहे आणि तो स्वत:ला भूमिकेत दाखवतो. मी त्याचा द आर्चीज पाहिला आहे आणि मला चित्रपट आवडला, मला त्याचे पात्र आणि चित्रपटातील इतर अनेक पात्रे आवडली. त्याला चित्रपटाची प्रक्रिया माहित आहे आणि आता मी त्याच्यासोबत आणखी चित्रपटांचे विषय शोधत आहे, असं श्रीराम राघवन यांनी म्हटलंय.