मुंबई : 80 च्या दशकातही बॉलीवूड चित्रपटांमध्ये असे अनेक सीन पाहायला मिळाले होते.  ज्याची आज कल्पना करणंही कठिण होतं. त्याचबरोबर आजच्या जमान्यात कोणत्याही अभिनेत्रीला बोल्ड सीन द्यायला हरकत नाही पण एक काळ असा होता की असे सीन फार कमी चित्रपटांमध्ये घडत होते. अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी 1982 मध्ये आलेल्या 'नमक हलाल' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रकाश मेहरा. या चित्रपटापूर्वी स्मिता पाटील यांनी असा कोणताही चित्रपट केला नव्हता. या चित्रपटात स्मिता साडीत दिसल्या होत्या.  पण या चित्रपटात एक अतिशय बोल्ड गाणं होतं. या चित्रपटात स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांच्यावर एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं. 'आज रपट जाये तो हमे ना ताहियो असे' या गाण्याचे बोल होते, या गाण्यातील प्रत्येक सीन आणि गाण्याचे प्रत्येक बोल अतिशय बोल्ड आणि रोमँटिक होते.


एका मुलाखतीत स्मिता यांनी सांगितलं होतं की, ती या गाण्याबद्दल खूप घाबरली होती. 'नमक हलाल' चित्रपटातील या गाण्यात अमिताभ आणि स्मिता पावसात भिजत चित्रिकरण करण्यात येणार होतं आणि स्मिता खूप घाबरल्या होत्या आणि हे गाणं चित्रित करताना संकोच करत होती आणि तिची भीती कमी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी स्मिता यांना शूटिंगपूर्वी बराचवेळ गप्पा मारल्या होत्या.


हे गाणं खूप रोमँटिक होतं, गाणं शूट केल्यानंतर त्यांनी विचार केला की, आपण असे सीन कधीच केले नाहीत. मात्र असे सीन दिल्यावर चाहत्यांना गाण्यातील हे सीन आवडतील की नाही हाच विचार करून स्मिता पाटील यांनी संपूर्ण रात्र रडून काढली.


स्मिता यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं होतं की, त्या आता एकही मुख्य प्रवाहातील चित्रपट करणार नाही. अमिताभ यांनी खूप समजावून सांगितल्यानंतर स्मिता या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयार झाल्या.  चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्मिता यांच्या चाहत्यांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला हे गाणं खूप आवडलं आणि स्मिता यांनी आपल्या चाहत्यांना हे गाणं आणि सीन आवडणार नसल्याचा तिचा अंदाज चुकीचा असल्याचं मान्य केलं.