नवी दिल्ली : कौन बनेगा करोड़पती-13 (KBC 13 ) या कार्यक्रमाच्या नावातच सारंकाही सामावलेलं आहे. सर्वसामान्यांनाही करोडपती होण्याची स्वप्न दाखवणाऱ्या आणि ती स्वप्न साकार करणाऱ्य़ा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळते. इथं येणाऱ्या अनेक स्पर्धक हा रिकाम्या हातानं परतला असं फार क्वचितच झालं. पण, इथं आलेल्या स्पर्धकाला शिक्षा झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे खरंय, आणि असं झालंयसुद्धा. देशबंधु पांडे नावाच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालय अधीक्षकांनी सहभाग घेतला होता. यानंतर त्यांच्यावर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अनेक चर्चांना उधाण आलं. ज्यावर रेल्वेकडूनच स्पष्टीकरण देत शिक्षेच्या कारणांची यादीच सादर करण्यात आली. 


काय होती कारवाईमागची कारणं? 


- रेल्वेकडून देण्य़ात आलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की, 5 ऑगस्टला मुख्यालयातून ई मार्केटप्लेस म्हणजेच संबंधित पेमेंट्सची परिस्थिती अपडेट करण्यासाठीचे आदेश देण्यात आले होते ज्यांची पूर्तता पांडे यांनी केली नव्हती. 


- काम पूर्ण केल्याशिवायच देशबंधु पांडे यांनी 6 ऑगस्टला केबीसीचा उल्लेख केल्याशिवाय 9 ते 13 ऑगस्टदरम्यान सुट्टीसाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये फक्त महत्त्वाचं कारण, इतकाच उल्लेख करण्यात आला होता. 


- पत्रकात सांगितल्यानुसार सदर कर्मचाऱ्याकडून 9 ऑगस्टला जीईएमसंबंधित काम पूर्ण न केल्यासंबंधी, कामावर बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी, अनधिकृत पद्धतीनं अनुपस्थित राहण्याप्रकरणी वरिष्ठ डीएमकडून नोटीस देण्यात आली होती. 


- पत्रकामध्ये चार्जशीटचाही उल्लेख करण्यात आला होता. 


- कर्मचाऱ्यानं दिलेल्य़ा उत्तरानंतर 27 ऑगस्टला तीन वर्षांपर्यंतच्या वेतनवाढीला रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. 


- वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार सीएल, चार्जशीट, अनुपस्थितीचं उत्तर किंवा शिक्षेदरम्यान कुठेही केबीसीचा उल्लेख नाहीये. 


- रेल्वेच्या म्हणण्यानुसार केबीसीतील त्यांच्या सहभागाबाबत प्राधिकारी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनाही कल्पना नव्हती. 


- पांडे यांच्यावर दंड ठोठावण्याची वेळ आणि त्यांचा केबीसीतील सहभाग हा निव्वळ योगायोग असल्याचं सांगण्यात आहे. 


- पत्रकात म्हटल्यानुसार मागच्या अनेक सूचनांचं पालन करण्यात अपयशी राहिल्यानंतर 3/8/21 रोजीसुद्धा त्यांच्याकडून कामाप्रती असणाऱ्या बेजबाबदार वृत्तीसाठी स्पष्टीकरण मागण्यात आलं होतं. 


KBC मध्ये सहभाग घेतला म्हणून असा पहिला व्यक्ती असेल ज्याचं खूप मोठं नुकसान झालं


 


कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालय अधीक्षक असणाऱ्या देशबंधु पांडे यांनी हल्लीच कौन बनेगा करोडपती - 13 मध्ये भाग घेतला होता. यादरम्यान, त्यांनी 3 लाख 20 हजार रुपयांची धनराशी जिंकली. पण, इथून ते जेव्हा आपल्या कामावर रुजू झाले तेव्हा मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. रेल्वेकडून त्यांच्या हाती एक चार्जशीट देत तीन वर्षांसाठी त्यांची पगारवाढ रोखण्याचा निर्णय़ देण्यात आला.