KBC मध्ये सहभाग घेतला म्हणून असा पहिला व्यक्ती असेल ज्याचं खूप मोठं नुकसान झालं

देशबंधू पांडे आणि त्यांचे कुटुंबीय आता तणावात आहेत. देशबंधूंनी केबीसीमध्ये भाग घेणे चांगलंच महागात पडलं. 

Updated: Aug 30, 2021, 10:53 PM IST
KBC मध्ये सहभाग घेतला म्हणून असा पहिला व्यक्ती असेल ज्याचं खूप मोठं नुकसान झालं title=

मुंबई: KBC चा 13 वा सीझन सुरू आहे. ज्या मंचावर करोडपती होण्याचं स्वप्न पाहिली जातात त्याच मंचावर गेल्यामुळे एका व्यक्तीला खूप मोठं नुकसान झालं आहे. करोडपतीच्या मंचावर आलेला असा हा पहिलाच व्यक्ती असेल ज्याचा मोठं नुकसान झालं आहे. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालय अधीक्षक देशबंधु पांडे यांनी सहभाग घेतला होता. 

देशबंधु पांडे यांना सहभाग घेणं चांगलंच महागात पडलं आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार देशबंधु यांना मोठं नुकसान झालं आहे. देशबंधु हॉटसीटवर बसल्यानंतर रेल्वेनं त्यांच्या हातात चार्टशीट दिली. इतकच नाही तर त्यांना 3 वर्ष पगारात कोणतीही पगारवाढ मिळणार नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने केलेल्या या कारवाईवर कर्मचारी संघटनेकडून विरोध दर्शवला जात आहे. 

वेस्ट सेंट्रल रेल्वे कमगार संघचे सचिव अब्दुल खालिद यांच्या म्हणण्यानुसार देशबंधु पांडे यांच्यासोबत रेल्वे प्रशासनाने खूप चुकीचं केलं आहे. त्यांची पगारवाढ रोखणं चुकीचं आहे. हा निर्णय रेल्वे प्रशासनानं मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. 

देशबंधु पांडे यांनी केबीसीच्या हॉटसीटवर बसण्यासाठी 9 ते 13 ऑगस्ट सुट्टी हवी असल्याचा अर्ज केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची सुट्टी अप्रूव्ह केली नाही. त्यानंतरही ते मुंबईमध्ये कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी गेले. KBCमध्ये त्यांनी 3 लाख 20 हजार रुपये जिंकलेही. मात्र त्यांच्या हातात रेल्वे प्रशासनाने चार्टशीट दिली. 

केबीसीमध्ये सहभागी होणं देशबंधु पांडे यांना खूप जास्त महागात पडलं. रेल्वे कर्मचारी देशबंधू पांडे मुंबईहून परतल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी आरोपपत्र सोपवण्यात आले. 3 वर्षांची वेतनवाढ थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. आरोपपत्र मिळाल्यानंतर आणि वेतनवाढ थांबवल्यानंतर, केबीसीमध्ये मिळालेल्या बक्षिसांचा आनंद नाहीसा झाला.

देशबंधू पांडे आणि त्यांचे कुटुंबीय आता तणावात आहेत. देशबंधूंनी केबीसीमध्ये भाग घेणे चांगलंच महागात पडलं. तीन वर्षात देशबंधूचे सुमारे दीड लाखांचे नुकसान होईल असे सांगितलं जात आहे. देशबंधू पांडे यांना केबीसीमध्ये 3 लाख 20 हजार मिळाले आहेत, त्यापैकी कर देखील कापला जाईल.